मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) या जम्मू काश्मीरमधील मोठ्या नेत्या असून पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) या पक्षाच्या प्रमुख आहेत. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या (कलम ३७० रद्दबातल ठरवण्याअगोदर) पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांनी भाजपा पक्षाला सोबत घेऊन जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. मात्र भाजपाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकले नाही.
४ एप्रिल २०१६ ते १९ जून २०१८ अशी साधारण दोन वर्षे मेहबुबा मुफ्ती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. त्या १९९६ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून बिजबेहरा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. येथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी पुढे १९९९ साली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
पुढे २००४ आणि २०१४ साली त्या खासदार झाल्या. अनंतनाग मतदारसंघातून त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. Read More
Iltija Mufti Bijbehara Assembly Constituency : सोमवारी दक्षिण काश्मीरमधील आठ विधानसभा मतदारंसघातील आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यापैकी बिजबेहरा…
Mehbooba Mufti Kashmir Encounter : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, जम्मू-काश्मीर अशांत आहे, गृहमंत्रालयाने तिथे घडणाऱ्या घटनांची जबाबदारी…
काश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) यांच्यामध्ये पुरेसं सामंजस्य निर्माण होऊ न…
नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तिन्ही जागा लढवू इच्छित आहेत आणि त्यावर ठाम राहण्याच्या निर्णयामुळे खोऱ्यातील राजकीय पक्षांची युती असलेल्या…