मासिक पाळी Photos
पौगंडावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. याच सुमारास मुलींना मासिक पाळी (Menstruation) यायला सुरुवात होते, वयात आल्यावर योनीमार्गे दर महिन्याला रक्तस्राव होण्याच्या प्रक्रियेला मासिक पाळी असे म्हटले जाते. प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. पाळी सुरू असण्याच्या दिवसात विश्रांतीची गरज असते.
<br /> दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. स्त्रीबीज-पुरूषबीज यांचा संयोग न झाल्याने ते फलित होत नाही. तेव्हा त्या बिजासहित आच्छादन रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते.Read More