म्हाडा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण सरकारी संस्था आहे. या संस्थेला म्हाडा (Mhada) असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये या संस्थेचे नाव Maharashtra Housing and Area Development Authority असे आहे. या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरुन ‘म्हाडा’ हे नाव प्रचलित झाले आहे. या सरकारी संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर म्हाडाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.


महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरांत घर मिळवून देण्याची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाच्या अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई परिसरात तब्बल ३०,००० घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था “बाँम्बे हाऊसिंग बोर्ड” या नावाने ओळखली जात होती. म्हाडाचे मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई येथे आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ असे म्हाडाचे एकूण विभाग आहेत. या विभागांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण धोरण राबवले जाते. म्हाडाअंतर्गत घर मिळवण्यासाठी तुम्ही https://www.mhada.gov.in/en या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.


Read More
Tender for Abhyudayanagar redevelopment extended till December 30
अभ्युदयनगर पुनर्विकासाच्या निविदेला ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

काळाचौकी येथील अभ्युदनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सध्या निविदा प्रक्रिया सुरु आहे.

mhada received report from Mumbai Board stating Taddev houses are unsold
म्हाडाची पावणेसात कोटींची घरे विक्रीविना ताडदेवमधील तीन घरे विजेत्यांकडून परत; एका घराचा सोडतीत समावेशच नाही

म्हाडाच्या मुंबई मंडळाला मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सोडतीसाठी प्राप्त झालेली ताडदेवमधील काही केल्या विकली जात नसल्याचे चित्र आहे.

Mhada Building, Residential Certificate, abhay yojana,
पुनर्वसित ८० इमारतींना म्हाडाचा दिलासा, निवासी दाखला न घेतलेल्या इमारतींसाठी अभय योजना; अतिरिक्त देयकाच्या भारातून मुक्ती?

मुंबईतील म्हाडा अभिन्यासातील अंदाजे ८० पुनर्वसित इमारतींत वर्षानुवर्षे निवासी दाखला न घेता रहिवासी वास्तव्यास आहेत.

mhada received report from Mumbai Board stating Taddev houses are unsold
१६०० हून अधिक म्हाडा कर्मचारी ३५ वर्षांपासून निवृतिवेतनापासून वंचित

म्हाडात एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून निवृत्तिवेतन मिळत असताना उर्वरित १६०० हून अधिक कर्मचारी गेल्या तीन दशकांपासून निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.

mhada received report from Mumbai Board stating Taddev houses are unsold
अभ्युदयनगर पुनर्विकासाच्या निविदेला मुदतवाढ ?

म्हाडाचे मुंबई मंडळ काळाचौकी येथील अभ्युदनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

Common people will get MHADA houses of public representatives and government officials Mumbai news
लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकाऱ्यांची ‘म्हाडा’ घरे सामान्यांना मिळणार?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत (म्हाडा) होणाऱ्या घरांच्या सोडतीत आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकांऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटात…

MHADA to build seven storey old age home in Majiwada Thane Mumbai news
ठाण्यातील माजीवाड्यात म्हाडा बांधणार सात मजली वृद्धाश्रम; नोकरदार महिलांसाठी वसतीगृही बांधणार

म्हाडाने ‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब’अंतर्गत मुंबई आणि एमएमआरमध्ये वृद्धाश्रम, तसेच नोकरदार महिलांसाठी वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प

ताथवडेतील या व्यासायिक संकुलाच्या विक्रीतून पुणे मंडळाला मिळणार १००० कोटी

chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

सर्वसामान्यांना खासगी प्रकल्पात परवडणाऱ्या दरात घर मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने २० टक्के सर्वसमावेशक योजना लागू केली आहे.

mhada lottery 2024 konkan board extend application deadline for 2264 homes
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२४ : २२६४ घरांच्या सोडतीला अखेर १५ दिवसांची मुदतवाढ, २५ डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया

२० टक्के योजनेला प्रतिसाद मंडळाच्या २२६४ पैकी सर्वाधिक ८२५ घरे १५ टक्के एकात्मिक योजनेतील असून या घरांना सर्वात कमी प्रतिसाद…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या