म्हाडा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण सरकारी संस्था आहे. या संस्थेला म्हाडा (Mhada) असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये या संस्थेचे नाव Maharashtra Housing and Area Development Authority असे आहे. या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरुन ‘म्हाडा’ हे नाव प्रचलित झाले आहे. या सरकारी संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर म्हाडाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.


महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरांत घर मिळवून देण्याची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाच्या अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई परिसरात तब्बल ३०,००० घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था “बाँम्बे हाऊसिंग बोर्ड” या नावाने ओळखली जात होती. म्हाडाचे मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई येथे आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ असे म्हाडाचे एकूण विभाग आहेत. या विभागांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण धोरण राबवले जाते. म्हाडाअंतर्गत घर मिळवण्यासाठी तुम्ही https://www.mhada.gov.in/en या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.


Read More
mhada administration
म्हाडाचा कारभार लवकरच कागदविरहीत; ई ऑफिस प्रणालीअंतर्गत सर्व सेवांचे संगणकीकरण होणार

म्हाडातील सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सेवांचे संगणकीकरण केले जाणार…

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?

पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाने ६७२ मूळ रहिवाशांसह सोडतीतील ३०५ विजेत्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता येथे सर्वसामान्यांनाही मोठ्या संख्येने…

Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश

अतिरिक्त चटईक्षेत्रफळाच्या स्वरुपात सदनिका सुपूर्द करण्याऐवजी त्या परस्पर लाटल्याप्रकरणात १ जुलै २०२४ पर्यंत सादर केलेल्या माहितीच्या सत्यतेबाबत असमाधानी असल्याचे मत…

Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई

वांगणीमधील घरांची हमी आणि संमतीच्या नावे गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणाऱ्या, म्हाडाला अंधारात ठेवून म्हाडाच्याच अधिकृत चिन्हाचा गैरवापर करणाऱ्या…

Redevelopment, Kamathipura, BMC, MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’ऐवजी पालिकेकडे ? विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय

कामाठीपुरा या सुमारे २७ एकरवर पसरलेल्या परिसरात ४७५ उपकरप्राप्त इमारती असून उपकरप्राप्त नसलेल्या १६३ इमारतींसह पुनर्बांधणी करण्यात आलेल्या १५ इमारती…

MHADA Mumbai Lottery 2024 Last eight days for winners to submit acceptance letter Mumbai news
म्हाडा मुंबई सोडत २०२४: स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी विजेत्यांना अखेरची आठ दिवसांची मुदत

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीतील २०१७ विजेत्यांपैकी ४५ विजेत्यांनी घरांसाठी स्वीकृती दिलेली नाही. त्यामुळे या विजेत्यांना शेवटची संधी म्हणून…

Mumbai MHADA submitted 1 lakh 11 thousand 169 documents to determine eligibility of mill workers
३८ हजार कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा, एक लाख ११ हजार १६९ कामगारांची कागदपत्रे सादर

म्हाडाच्या मुंबई मंडळाने गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्यासाठी एक लाख ११ हजार १६९ कागदपत्रे सादर केली.

MHADA Mumbai Mandal Lottery 2024, MHADA,
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : लवकरच विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण, विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते देकारपत्र

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीतील निवासी दाखला मिळालेल्या आणि स्वीकृती दिलेल्या विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

Mumbai MHADA submitted 1 lakh 11 thousand 169 documents to determine eligibility of mill workers
म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ : २०१७ पैकी ४०० हून अधिक घरे परत, तर १५३० विजेत्यांची घरासाठी स्वीकृती

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठीच्या आॅक्टोबर २०२४ मधील सोडतीतील ४४२ विजेत्यांनी घरे परत (सरेंडर) केली आहेत.

in mumbai mhada konkan mandal huge response for houses under first priority scheme
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम प्राधान्य’योजनेअंतर्गत २० टक्क्यांतील घरांना प्रचंड प्रतिसाद, ६६१ पैकी ४५३ घरांच्या विक्रीची शक्यता

म्हाडाच्या कोकण मंडळातील ११ हजार १८७ घरांची विक्री ‘प्रथम प्रधान्य’ तत्वावर करण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे.

mhada reduces maintenance charges For 9409 flat owners in virar bolinj colony
विरार – बोळींजमधील म्हाडा रहिवाशांना अखेर दिलासा, ९४०९ सदनिकाधारकांच्या मासिक सेवा शुल्कात कपात

अल्प गटातील रहिवाशांना आता प्रति महिना १४५० रुपये, तर मध्यम गटातील रहिवाशांना २४०० रुपये सेवाशुल्क

संबंधित बातम्या