म्हाडा Videos

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण सरकारी संस्था आहे. या संस्थेला म्हाडा (Mhada) असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये या संस्थेचे नाव Maharashtra Housing and Area Development Authority असे आहे. या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरुन ‘म्हाडा’ हे नाव प्रचलित झाले आहे. या सरकारी संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर म्हाडाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.


महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरांत घर मिळवून देण्याची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाच्या अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई परिसरात तब्बल ३०,००० घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था “बाँम्बे हाऊसिंग बोर्ड” या नावाने ओळखली जात होती. म्हाडाचे मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई येथे आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ असे म्हाडाचे एकूण विभाग आहेत. या विभागांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण धोरण राबवले जाते. म्हाडाअंतर्गत घर मिळवण्यासाठी तुम्ही https://www.mhada.gov.in/en या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.


Read More
Maharashtra Hasya Jatra Fame Gaurav More Nikhil Bane and BB Winner Shiv Thackeray won Mhada lottery
Mhada Lottery Winners: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे, निखिल बने व शिव ठाकरेला लागली लॉटरी

MHADA Mumbai Lottery Gaurav More, Shiv Thackeray: राजू शेट्टी यांनी पवईतील घरासाठी अर्ज केला होता. तीन घरांसाठी एकच, राजू शेट्टी…

draw 2030 houses of mumbai mandal of mhada on september 13 was finally postponed
MHADA Lottery Sept 2024 Update: म्हाडाची घरं झाली स्वस्त; विधानसभा निवडणूक पुढे जाताच मोठा निर्णय

https://youtu.be/yJWEgQiAfGk?si=4GZVck1_VTPG8O5z म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी १३ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीतील अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेसाठी…

MHADA lottery Two thousand flats for sale in Mumbai Check eligibility locations and how to apply
MHADA Mumbai Lottery: म्हाडाचा अर्ज कसा भराल? डिपॉझिट ते महत्त्वाचे कागदपत्र, A to Z Updates प्रीमियम स्टोरी

यंदा म्हाडाच्या लॉटरीमध्ये तब्बल २०३० युनिट्स म्हणजेच घरं ही उपलब्ध असणार आहेत यामध्ये, दारिद्र्य रेषेखालील, तसेच कमी व मध्यम उत्पन्न…

ताज्या बातम्या