मिताली मयेकर Videos

मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी मुंबईमध्ये झाला. शाळेमध्ये असल्यापासून मितालीला अभिनयाची आवड होती. वयाच्या १३ व्या वर्षी तिने २००९ मध्ये इरफान खानच्या ‘बिल्लू’ हिंदी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे कॉलेजमध्ये असताना तिने एकांकिकामध्ये अभिनय केला.

‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’, ‘तु माझा सांगाती’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमध्ये मितालीने काम केले आहे. २०१५ मध्ये ‘उर्फी’ तिचा पहिला मराठी प्रदर्शित झाला. त्यानंतर तिने ‘यारी दोस्ती’, ‘आम्ही बेफिकर’, ‘हॅशटॅग प्रेम’ हे चित्रपट केले. झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. यामध्ये मितालीने सायली बनकर हे पात्र साकारले होते. मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी विवाहबंधनामध्ये अडकले. त्याआधी ते एकमेकांना डेट करत होते. Read More
Fasklas Dabhade team visited Jejuri Khandoba Devasthan
फस्क्लास दाभाडेच्या टीमची खंडोबा चरणी भेट; सिद्धार्थसाठी मितालीने घेतला एक नंबर उखाणा

फस्क्लास दाभाडे या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अमेय वाघ, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, तसेच अभिनेत्री मिताली मयेकर, क्षिती जोग हे…