२००४ ते २०२२ अशी सलग अठरा वर्ष भारतीय महिला क्रिकेट संघाची जबाबदारी पेलवणाऱ्या मिताली राजचा (Mithali Raj) जन्म ३ डिसेंबर १९८२ रोजी राजस्थानमध्ये झाला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये तिच्या नावाचा उल्लेख सुवर्ण अक्षरांनी केला जाईल.
२६ जून १९९९ रोजी तिने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सात सामन्यांमध्ये सलग अर्धशतक करण्यापासून ते सात हजारांपेक्षा जास्त धावा करण्यापर्यंत अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत. एकूण कारकीर्दीमध्ये तिने ३३३ सामन्यांमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विश्वचषकामध्ये सर्वात जास्त वेळा कर्णधारपद भूषवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
२००३ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि २०२१ मध्ये मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने तिला सन्मानित केले. जून २०२२ मध्ये तिने निवृत्ती घेतली.Read More