मिझोराम निवडणूक २०२३ Videos
काही दिवसांपूर्वी निवडणुक आयोगाने पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये ईशान्येकडील मिझोराम (Mizoram Election 2023) या राज्याचाही समावेश आहे. २०१८ मध्ये निवडलेल्या विधानसभेतील उमेदवारांची मुदत १७ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर तेथे निवडणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. तेथे ४० विधानसभेच्या जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच मतदानाचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. या राज्याच्या लोकसंख्येतील ८.५ लाख लोकांकडे मतदान करण्याचा अधिकार आहे. मिझोराम विधानसभेच्या (Mizoram Assembly Election 2023) ४० जागांपैकी ३९ जागा या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
२०१८ मध्ये मिझो नॅशनल फ्रंट (MNF) या पक्षाने ४० पैकी २६ जागांवर विजय मिळवत राज्यामध्ये सरकार स्थापन केले होते. मिझोरामचे सध्याचे मुख्यमंत्री झोरामथांगा आणि मिझो नॅशनल फ्रंटचे प्रमुख झोरामथांगा आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्नात दिसत आहेत. या पक्षाच्या विरोधामध्ये असलेला झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) हा पक्ष बळकट होत आहे. २०१८ मध्ये त्यांनी ८ जागा जिंकल्या होत्या. तर कॉंग्रेसला ५ आणि भाजपाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. मिझो नॅशनल फ्रंटला मागे टाकण्यासाठी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि कॉंग्रेस एकत्र येण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.
Read More