मनसे

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
Marathi Bhasha Gaurav Divas Bollywood Actor Vicky Kushal presented Kusumagrajs poem
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचा विशेष कार्यक्रम; विकीनं सादर केली कुसुमाग्रजांची कविता

Vicky Kaushal: मराठी भाषा गौरव दिनाच्या (Marathi Bhasha Gaurav Divas) निमित्ताने राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक…

MNS leader Shalini Thackeray
Pune Rape News: ‘शिवशाही’ नाव असलेल्या बसमध्येच बलात्कार, आरोपीचा ‘चौरंग’ करा नाहीतर छत्रपतींचे नाव घेऊ नका; मनसेची मागणी

Shalini Thackeray on Pune Rape case: पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये बुधवारी पहाटे शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर नराधमाने बलात्कार केला. या…

book exhibition at Shivaji Park news in marathi
शिवाजीपार्कवर मनसेचे आज पुस्तक प्रदर्शन; पैठणी कशी विणतात तेही पाहता येणार

महाराष्ट्राचे राजवस्त्र असलेली पैठणी कशी विणतात हे पाहण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे.

Abhijat Sanman ceremony, MNS ,
नाशिक : मनसेतर्फे शुक्रवारी अभिजात सन्मान सोहळा

मराठी राजभाषा गौरव दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मनसेच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता अभिजात सन्मान…

शिरुर नगरपरिषदेस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस: मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद

शिरुर नगरपरिषद कडून  कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने केले जात नसून या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा  वतीने पालिकेस…

supporter put up banner to urging raj Thackeray and uddhav Thackeray to unite
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसाठी लावलेल्या ‘त्या’ बॅनरवर नेमकं काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. त्याचं कारण…

mns activists vandalized akola pimpalkhuta bus after branch banner found torn in Tulanga Khurd
अकोला : खळ खट्याक!व्हिडिओ, बॅनर फाटले; मनसैनिकांनी फोडली बस…

जिल्ह्यातील तुलंगा खुर्द येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे बॅनर फाटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याच्या निषेधार्थ मनसैनिकांनी अकोला पिंपळखुटा बसची तोडफोड…

CM Devendra Fadnavis on Meeting with MNS chief Raj
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राज ठाकरेंची भेट घेण्यामागील कारण, म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यानंतर…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

sandip deshpende gave a reaction on raj thackeray and cm devendra fadanvis meet
Sandeep Deshpande: “राजकीय भूमिका या वेगळ्या…”; संदीप देशपांडेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या अचानक…

CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray in MArathi
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; संभाव्य युतीच्या चर्चेबाबत मुनगंटीवार म्हणाले, “नाशिकमध्ये जेव्हा…”

Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.

Applications for opening a new account and withdrawing money from the bank in Bank of Maharashtra are available in Marathi language pune news
महाबँकेत आता मराठीतून अर्ज, नक्की काय घडले !

महाबँकेत मराठी भाषेचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केलेली मागणी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या व्यवस्थापनाने मान्य केली आहे.

MNS Pune Bullet Riders Beaten video viral
MNS Pune Bullet Riders Beaten: पुण्यात बुलेटस्वारांना मनसे स्टाईल चोप; हिरोगिरी अंगाशी

MNS Pune Bullet Riders Beaten: कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या, फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटचा त्रास हे सर्वच शहरात नित्याची गोष्ट झाली आहे.…

संबंधित बातम्या