मनसे

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
MNS Raj Thackeray, MNS, MNS Failure, Amit Thackeray,
महाराष्ट्र नवनिर्माणाचे इंजिन १८ वर्षांनंतरही यार्डातच, विधिमंडळातील अस्तित्वही संपुष्टात

महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी गेल्या १८ वर्षांपासून झटणाऱ्या राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाचे इंजिन पुन्हा एकदा यार्डातच रुतले आहे.

assembly elections Mahayuti made strong run in state and literally blown away Mahavikas Aghadi
आघाडीच्या पराभवात बंडखोर, वंचित, मनसेचा हातभार, कुठे घडला प्रकार ? महायुतीच्या उमेदवारांना दोन मतदार संघात तारले.

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडविला आहे

raj thackeray mns party disqualification
MNS in Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मनसेची मान्यता रद्द होणार? विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आयोगाच्या निकषांची टांगती तलवार!

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षमान्यताचे प्रश्न चर्चेत आला आहे.

What is the reasons of MNSs defeat in the vidhansabha elections 2024
एकही जागा नाही, मनसेच्या निवडणुकीतील पडझडीची कारणं काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडीला फटका बसला तर दुसरीकडे मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही. कल्याण ग्रामीणमधील जागाही मनसेला…

Thane city MNS , MNS campaigning Thane, MNS results,
ठाणे शहरात मनसेची प्रचारात केवळ हवाच, निकालात मात्र पिछेहाट

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर, ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात तिरंगी…

Assembly Election 2024 Kalyan Rural Assembly Constituency MNS Raju Patil defeated by Rajesh More kalyan news
मुख्यमंत्र्यांवरील व्यक्तिगत टीका कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांना भोवली? मोरे पाहुणे म्हणून आले आणि वतनदार बनले

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा एक ग्रामीण, नागरीकरण झालेलामिश्रित मतदारसंघ.

MNS Ex MLA Raju patil emotional post about Massive defeat in Maharashtra vidhansabha election results details Raj Thackeray Only MLA Looses
MNS Lost, Raju Patil Reacts: मनसेला शून्य जागा, २०१९ चे एकमेव आमदार राजू पाटील काय म्हणाले?

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर (२३ नोव्हेंबर) या…

raj Thackeray latest marathi news
विधिमंडळातील मनसेचे अस्तित्व संपुष्टात

महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी गेल्या १८ वर्षांपासून झटणाऱ्या राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाचे इंजिन पुन्हा एकदा यार्डातच रुतले आहे.

khadakwasla bjp bhimrao tapkir
Khadakwasla Vidhan Sabha Result : खडकवासल्यात मनसेची मते निर्णायक

जास्त मतदान झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीची परंपरा कायम राहिली. मात्र, या निवडणुकीच्या निकालामध्ये मनसेची मते निर्णायक ठरली.

MNS Raju Patil on Vidhan Sabha Election Result
MNS Raju Patil on Election Result : “गेली पाच वर्षे अपेक्षेपेक्षा जास्त…”, मनसेच्या एकमेव आमदाराचं पराभवानंतर वक्तव्य; म्हणाले, “निकाल येतील जातील…” फ्रीमियम स्टोरी

MNS Raju Patil Vidhan Sabha Election Result 2024 : यंदाच्या निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

संबंधित बातम्या