मनसे Videos

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
mns raj thackeray uncut speech in kalyan maharashtra vidhan sabha election
Raj Thackeray : कल्याणमध्ये राज ठाकरेंची गर्जना; राजू पाटील यांच्या सभेत महायुतीला केलं लक्ष्य?

Raj Thackeray Speech In Kalyan: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस…

mns chief raj thackeray sabha in thane for mns assembly candidate avinash jadhav
Raj Thackeray in Thane Live: अविनाश जाधवांसाठी राज ठाकरेंची ठाण्यात सभा Live

Raj Thackeray Thane Live: मनसेचे ठाण्यातील उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडत…

MNS Chief Raj Thackerays Sabha LIVE in Raju Patils Kalyan Rural Assembly Constituency
Raj Thackeray, Raju Patil: राज ठाकरेंची जाहीर सभा, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून LIVE

Raj Thackeray Live With Raju Patil: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. मनसेच्या प्रचाराचा नारळ आता…

Criticism of casteism Sharad Pawar gave a challenge to Raj Thackeray
Sharad Pawar on Raj Thackeray: जातीयवादाची टीका, शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषमातून शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला आहे. यासंदर्भात विचारलं असता शरद पवारांनी…

Mahayuti will support MNS for vidhansabha election 2024 in Mahim
Mahayuti and MNS: माहीममध्ये महायुती मनसेला सहकार्य करणार?

माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी देखील उमेदवारी…

MNS Leader Raju Patil filled the election nomination form in the presence of Raj Thackeray
Raj Thackeray At Kalyan: राज ठाकरेंच्या उपस्थितीत राजू पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीणमधून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या प्रसंगी पक्षाचे अध्यक्ष राज…

Sharmila Thackeray has supported MNS candidates on Shivtirtha in the upcoming assembly elections
Sharmila Thackeray: शिवतीर्थावर उमेदवारांचं औक्षण; शर्मिला ठाकरेंनी मागितली ‘ही’ ओवाळणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी अमित ठाकरे, अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचं औक्षण करण्यात आलं. राज…

Sanjay Raut gave a reaction on Amit Thackerays candidature for maharashtra vidhansabha election 2024
Sanjay Raut on Amit Thackeray: अमित ठाकरेंची उमेदवारी, ठाकरे गटासमोर पेच? संजय राऊत म्हणतात…

मनसे नेते अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरेंविरोधात आता शिवसेना ठाकरे गट उमेदवार देणार…

ताज्या बातम्या