personal information
मोईन अली (Moeen Ali) हा इंग्लंडकडून खेळणारा क्रिकेटपटू आहे. तो उत्तम डावखुऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडे सामनावीर म्हणून खेळण्याचा अनुभव आहे. परंतु मोईल अली मध्यम फळीमधील उत्कृष्ट फलंदाज आहे असे म्हटले जाते. पहिल्या ते पाचव्या अशा कोणत्याही स्थानावर तो खेळू शकतो. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीसाठीही तो प्रसिद्ध आहे.
आपल्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर तो समोरच्या संघातील खेळाडूंना बाद करण्यात पटाईत आहे. एका उत्तम ऑलराउंडरसाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे आहे. मोईन अली क्षेत्ररक्षणामध्येही सक्षम आहे.
२०१४ मध्ये त्याने टेस्ट, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळत आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या इंग्लंडच्या संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.