मोहम्मद सिराज News

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म १३ मार्च १९९४ रोजी हैदराबादमध्ये एका मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये झाला. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली. परवडत नसतानाही त्यांनी महागडी क्रिकेट किट सिराजला आणून दिली. लहानपणी गल्ली क्रिकेट खेळत मोहम्मद सिराजने प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. पुढे मित्राच्या मदतीने त्याने चार मिनार क्रिकेट क्लबमध्ये खेळायची संधी मिळाली. २०१५ मध्ये चारमिनार येथे झालेल्या सामन्यामध्ये त्याने भेदक गोलंदाजी करत पाच गडी बाद केले. या क्रिकेट क्लबमधील चांगल्या कामगिरीच्या बळावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये हैदराबादच्या संघात निवड करण्यात आली.


२०१५-१६ मध्ये मोहम्मद सिराजने रणजी स्पर्धेमध्ये पदार्पण केले. पुढे लगेचच त्याला मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा खेळता आली. २०१६-१७ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने १८.९२ च्या सरासरीने ४१ बळी घेतले. तेव्हा हैदराबादसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. २०१७ च्या आयपीएलमध्ये त्याच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २.६ कोटी रुपयांची बोली लावली. त्यावर्षी तो हैदराबादकडून काही सामने खेळला. पुढे २०१८ च्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सिराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात सामील केले. तो आरसीबीच्या प्रमुख गोलदांजांपैकी एक आहे.


२०१७ मध्ये सिराजची भारतीय संघात निवड करण्यात आली. तेव्हा न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यामध्ये त्याने केन विल्यमसन या न्यूझीलंडच्या कर्णधाराची विकेट घेत आपली क्षमता दाखवून दिली. २०१९ मध्ये एकदिवसीय, तर २०२० मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. सध्या भारतीय वेगवान गोलदाजांपैकी एक आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीचे सोनं करत गोलंदाजांच्या रॅकिंगमध्ये आपले स्थान मिळवले. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये त्याची समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकामध्येही तो दिसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



Read More
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”

Mohammed Siraj Mahira Sharma : जनाई भोसलेनंतर बिग बॉस फेम अभिनेत्रीशी जोडलं जातंय मोहम्मद सिराजचं नाव

Mohammed Siraj Zanai Bhosle Affair Asha Bhosle Granddaughter Breaks Silence on Relationship Rumours with Instagram Story
Mohammed Siraj Zanai Bhosle: मोहम्मद सिराज व आशा भोसलेंची नात खरंच एकमेकांना डेट करतायत? जनाईने फोटो पोस्ट करत केला खुलासा

Mohammad Siraj Zanai Bhosle: आशा भोसलेंची नात जनाई भोसले हिने मोहम्मद शमी आणि तिच्या नात्याबाबत वक्तव्य करत मोठा खुलासा केला…

Mohammad Siraj dating singer Asha Bhosle granddaughter Zanai Bhosle rumored after Birthday party photo viral
Mohammad Siraj : मोहम्मद सिराज गायिका आशा भोसले यांच्या नातीला करतोय डेट? व्हायरल फोटोने सोशल मीडियावर चर्चेला उधाण फ्रीमियम स्टोरी

Mohammad Siraj dating rumours : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नातीला मोहम्मद सिराज डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांचा…

Champions Trophy 2025 Team India Squad Fast bowler Mohammed Siraj was dropped
Champions Trophy 2025 : मोहम्मद सिराजला टीम इंडियातून डच्चू! रोहित शर्माने सांगितलं निवड न होण्यामागचं कारण

Mohammed Siraj Drop : वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. त्याच्याऐवजी अर्शदीप…

IND vs AUS Pat Cummins Challenges Third Umpire Decision and asks for review on Siraj Wicket
IND vs AUS: सिराजच्या विकेटवरून मोठा ड्रामा, कमिन्सने तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर घेतला रिव्ह्यू; मैदानावरील पंचांनी पाहा काय केलं?

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटीत कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने तिसऱ्या पंचाच्या निर्णयाला आव्हान देत पुन्हा रिव्ह्यू…

Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?

Virat Kohli Video: विराट कोहलीचा स्टंप माईकवर बोलतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट सिराजला रागात सांगत आहे, की…

Mohammed Siraj Marnus Labuschagne Bail Switch Helps Team India to Take 3rd Wicket in Gabba Video Viral IND vs AUS
IND vs AUS: सिराजची युक्ती अन् नितीश रेड्डीने मिळवून दिली विकेट, लबुशेनला बेल्सची परत अदलाबदली करणं पडलं महागात; VIDEO व्हायरल

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा मैदानावर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि…

IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य

सिराज आणि हेडच्या वादावर भारताचे माजी दिग्गज खेळाडू एस श्रीकांत यांनी सिराजला फार तिखट शब्दात सुनावलं आहे.

Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?

ICC Punished Siraj and Head: मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांना आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट…

Mohammed Siraj Travis Head May Face ICC Disciplinary Action After Heated Argument
Siraj-Head Fight: सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडणार महागात, ICC कारवाई करण्याच्या तयारीत

Siraj-Head Fight Update: मोहम्मद सिराजचा मार्नस लबुशेननंतर ॲडलेड कसोटीत ट्रॅव्हिस हेडबरोबरही वाद झाला. आयसीसीने या प्रकरणाची दखल घेतली असून आता…

IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?

IND vs AUS: ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात वादावादी झाली होती. यानंतर सिराज फलंदाजीला आल्यानंतर…

ताज्या बातम्या