एमपीएससी

Maharashtra Public Service Commission


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) या संस्थेची निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली आहे. या महाराष्ट्र राज्यातील A आणि B गटातील नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. गुणवत्ता आणि नियम यांनुसार अर्ज करणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एमपीएसचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.


महाराष्ट्र राज्याचे कामकाज सुरळीत आणि पूर्व क्षमतेने सुरु राहावे आणि भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता राहावी अशी काही महत्त्वपूर्ण कामे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पूर्ण केली जातात. स्पर्धा परीक्षा, भरतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची पदोन्नती, त्यांच्या बदल्या याशिवाय शिस्तभंग प्रकरणाच्या संदर्भातील निर्णय घेताना मदत करणे यांसारख्या गोष्टींची पूर्तता या संस्थेद्वारे केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेची विभागणी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्तव चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्याक, दिवाणी न्यायाधीश यांसारख्या अनेक जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते. वयवर्ष १९ वर्ष पूर्ण असलेल्या राज्याच्या सरकारी पदासाठी एमपीएससी परीक्षेद्वारे अर्ज करु शकते.


 


खुल्या वर्गातील उमेदवार वयवर्ष ३८ पर्यंत आणि राखीव वर्गातील उमेदवार वयवर्ष ४३ पर्यंत या स्पर्धा परीक्षांना बसू शकतात. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येते. असे असले तरी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. किशोर राजे निंबाळकर हे या संस्थेचे प्रमुख आहेत.


Read More
mpsc comfort zone loksatta
MPSC मंत्र : ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर

नव्या पॅटर्नला सामोरे जाताना जुन्या काही सवयी सोडाव्या लागतील. नवे बदल स्वीकारावे लागतील. राज्यसेवा मुख्य परीक्षा एप्रिलमध्ये प्रस्तावित आहे.

mpsc exam result list announced social welfare category
वादात सापडलेल्या एमपीएससीच्या या परीक्षेची उत्तरतालिक जाहीर, हरकतीसाठी मुदत…

जा.क्र.०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण) व जा.क्र.१३२/२०२३ सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

mpsc exam loksatta
नोकरीची संधी : आयोगाच्या अर्जांना मुदतवाढ

उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याच्या विहीत दिनांकास (१ फेब्रुवारी २०२५ रोजी) केवळ वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची…

mpsc exam new pattern loksatta
MPSC मंत्र : नव्या पॅटर्नची प्रतीक्षा

गेल्या ५० वर्षात परीक्षा पद्धतीत आयोगाने अनेक धोरणात्मक बदल केले. UPSC च्या धर्तीवर राज्यसेवा परीक्षा पद्धती हा निर्णय आयोगाचा गुणात्मक…

mpsc students strongly oppose descriptive exam mode
‘वस्तुनिष्ठ बहुपर्यायी’ परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी

विद्यार्थ्यांची मागणी नसतानादेखील परीक्षा पद्धती जबरदस्तीने त्यांच्यावर लादली जात आहे. ही एकप्रकारे विद्यार्थ्यांची गळचेपी केली जात आहे.

MPSC will implement Descriptive Pattern for Maharashtra Gazetted Civil Services Main Exam from 2025
राज्यात ‘पीएसआय’ पदाच्या तीन हजार जागा रिक्त, विद्यार्थी म्हणतात…

एमपीएससीकडून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा) मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ पासूनच लागू केला जाणार आहे.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…

राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

Maitreyi Jamdade student of Mahajyoti toper in girls in state in MPSC exam
‘एमपीएससी’ परीक्षेत ‘महाज्योती’ची मैत्रेयी जमदाडे राज्यात मुलींमध्ये अव्वल फ्रीमियम स्टोरी

एमपीएससीमार्फत २०२२-२३ वर्षात घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (राजपत्रित) पदाच्या अंतिम परीक्षेत महाज्योती संस्थेची मैत्रेयी अविनाश जमदाडे मुलींमध्ये…

mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : राज्यघटनेची ७५ वर्षे सराव प्रश्न

भारतीय राज्यघटना दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंमलात आली. त्यास २०२४ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये…

mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ४३१ जागांसाठी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही शेवटची वस्तूनिष्ठ परीक्षा नुकतीच घेण्यात आली.

MPSC GR
MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमार्यदेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा…

संबंधित बातम्या