मुलायम सिंह यादव News
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांनी बीए, बीटी आणिएमए अशा पदव्या मिळवल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये ते उत्तर प्रदेश राज्यातील कर्नाल या ठिकाणच्या एका विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. राम मनोहर लोहिया आणि राम नारायण अशा नेत्यांकडून त्यांनी राजकारणाचे, समाजकारणाचे धडे गिरवले. पुढे १९६७ मध्ये ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेत विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना अटक झाली होती.
१९८९ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. आत्तापर्यंच तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. एच टी देवेगौडा सरकारमध्ये त्यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. १९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. उत्तर प्रदेश राज्यामध्ये हा सर्वात मोठा पक्ष मानला जातो. बरीच वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या मुलायम सिंह यादव हे २०२२ मध्ये आजारी पडले. यातच त्यांचा अंत झाला. १० ऑक्टोबर २०२२ रोजी गुरुग्राममध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर समाजवादी पार्टीची जबाबदारी त्यांच्या मुलाच्या, अखिलेश यादव यांच्या खांद्यांवर पडली आहे.Read More