सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.
सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.
महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
तब्बल ७०० अत्याधुनिक यंत्रमागांद्वारे वेगवेगळ्या तीन प्रकल्पांतून बोराना वीव्हज लिमिटेडकडून प्रति वर्ष २,३३३ लाख मीटर सिंथेटिक ग्रे फॅब्रिक या कृत्रिम…