सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
Mumbai municipal corporation waste tender: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, ही कचराभूमी भारतातील २२ प्रमुख मिथेन उत्पादन करणाऱ्या हॉटस्पॉट्सपैकी एक…
महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायद्याच्या (एमआरटीपी) कलम ५३ (१) आणि मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम ४८८ अंतर्गत ट्रस्टला मंदिराचे बांधकाम पाडण्याबाबत…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत मिरा रोड मेट्रो स्थानकांवरून गाड्यांच्या चाचणीला सुरुवात झाली.