मुंबई न्यूज News
सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More