मुंबई News

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
Mumbai Municipal Corporation , meeting, sculptors ,
पालिकेच्या बैठकीत मूर्तिकारांमध्येच हाणामारी, पीओपी विरुद्ध शाडूची माती वाद चिघळला; भर सभेत पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या फेकल्या

येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने बोलवलेली मूर्तिकारांची बैठक हाणामारीने गाजली. पीओपी मूर्ती निर्माते विरुद्ध शाडू माती मूर्तिकार…

Sunil Shetty, Kashmir, Sunil Shetty latest news,
काश्मीर हा भारताचाच भाग… फिरायला फक्त तिथेच जायचे… अभिनेते सुनील शेट्टी नेमके काय म्हणाले ?

अभिनेते सुनील शेट्टी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले.

MHADA , houses , residents , collapsed buildings ,
‘त्या’ उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांनाही आता घरे, बृहतसूचीअंतर्गत घरे देण्याचा म्हाडाचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय

दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या वा रिकाम्या केलेल्या इमारतींमधील तळमजल्यावरील रहिवाशांनाही आता हक्काची घरे देण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.

Ghatkopar , Kurla , water , Water supply,
घाटकोपर, कुर्लावासीयांनो आज पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवा, काही भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार

घाटकोपर पश्चिम येथे महानगरपालिका प्रशासनामार्फत पाणीपुरवठाविषयक विविध कामे प्रस्तावित असून ही कामे शनिवारी हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Mumbai Municipal Corporation , Pahalgam,
पहलगामच्या आघातांवर मानसिक समुपदेशनाची फुंकर… जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महापालिकेची मानसिक आरोग्य सेवा!

समुपदेशन, तीव्र तणावाचे मूल्यमापन, ‘पीटीएसडी’ची (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) शक्यता, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात भरती अशा सेवा दिल्या जाणार आहेत.

Mumbai To Almaty kazakhstan flight
मुंबई – अल्माटी आता थेट विमान…

कझाकस्तान आणि भारतादरम्यान सुरू केलेल्या विमान सेवेला २० वर्षे झाली असून त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

pisavli village land news in marathi
कल्याणस्थित पिसवली गावातील जागा कोणाची ? मालकीहक्काची चौकशी करा – उच्च न्यायालयाचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

जागेवर मालकीहक्क सांगणाऱ्या संरक्षण अधिकाऱ्यांना जागेचे अतिक्रमणांपासून संरक्षण करण्यात आलेल्या अपयशाबाबतही न्यायालयाने टीका केली.

shivneri buses loksatta news
पहलगाम हल्ल्यानंतर परतलेल्या पर्यटकांसाठी एसटीची शिवनेरी धावली!

एकूण २५२ पर्यटकांना मुंबई विमानतळावरून त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ८ शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

Prabhadevi flyover closed loksatta
सव्वाशे वर्ष जुना पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, प्रभादेवी पुलाचे चार-पाच दिवसांत पाडकाम

दक्षिण मुंबईतून अटल सेतूवर अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीए ४.५ किमी लांबीचा वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधत आहे.

Share Market
Share Market : मुंबई शेअर बाजारात सुमारे १००० अंकांची घसरण, सलग सात दिवसांच्या तेजीला ब्रेक; भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम

Share Market : निफ्टी २४,००० च्या खाली घसरला आहे, तर सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला आहे.

ताज्या बातम्या