मुरलीधर मोहोळ News

कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला आहे. मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.

कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली.


Read More
Murlidhar Mohol new cm of Maharashtra
Murlidhar Mohol: ‘मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार?’ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, “माझ्या नावाची चर्चा…” फ्रीमियम स्टोरी

Murlidhar Mohol is New CM: महायुतीच्या सत्तास्थापनेला होत असलेला उशीर आणि मुख्यमंत्री कोण होणार? याचे गुढ वाढत असताना आता मुख्यमंत्रीपदासाठी…

Muralidhar Mohol criticizes Congress for spoiling atmosphere before elections
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस वातावरण बिघडविण्याचे काम करतेय, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची टीका

काँग्रेस नेत्यांमध्ये एक वाक्यता नसून त्यांच्याकडे विचार आणि विषय नसल्यामुळे अशी विधाने करून निवडणुकीच्या तोंडावर वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत,…

Murlidhar Mohol allegations, Sharad Pawar,
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, चारवेळा..!

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत.

Murlidhar Mohol, air travel students,
मोहोळ यांच्या कार्यालयात दूरध्वनी करताच १२० विद्यार्थ्यांच्या हवाई प्रवासातील विघ्न दूर! जाणून घ्या नेमकं काय घडलं…

पुण्यातील विद्यार्थ्यांचा गट दिल्ली व जालंधरच्या सहलीसाठी आला होता. ते सर्वजण पुण्यात विमानाने येणार होते. हे विद्यार्थी जालंधरहून दिल्लीला बसने…

Union Minister Muralidhar Mohol friend visit in Kolhapur pune news
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ संघटनात्मक दौऱ्यानिमित्त रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात गेले असताना त्यांच्या सुरक्षेसाठीच्या  बंदोबस्तात मोहोळ यांना तालिमितील जुना मित्र भेटला.

BJP, Murlidhar Mohol, Pune, assembly elections, Kasba constituency, bjp lok sabha set back, party strategy, Parvati Assembly constituency, Pune Cantonment Assembly constituency,
मुरलीधर मोहोळांचे पक्षातील वजन वाढले, विधानसभेसाठी दिली मोठी जबाबदारी फ्रीमियम स्टोरी

लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला राज्यात मोठा फटका बसला. त्यामुळे सतर्क झालेल्या भाजपने आगामी विधानसभेसाठी गेल्या काही महिन्यांपासून रणनीती आखण्यास…

16 check in counters at the old terminal of pune airport says muralidhar mohol
पुणेकर हवाई प्रवाशांना खुशखबर! पुणे विमानतळाबाबत मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

‘नव्या टर्मिनलशी एकात्मिक असणारी विमानतळ प्रणाली वापरण्याचा आणि खरेदी दालने उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे

We will achieve hundred percent success in Satara district says Muralidhar Mohol
सातारा जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळवू – मुरलीधर मोहोळ

लोकसभेची सातारची जागा पक्षाने जिंकली, विधानसभा निवडणुकीतही कार्यकर्त्यांच्या ताकदीवर सातारा जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळवू, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान…

murlidhar-moho
विमानांच्या ताफ्यात पाच वर्षांत हजाराने भर! केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांची माहिती

प्रवाशांची सुरक्षितता आणि आरामदायी प्रवास या बाबीही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मनोरंजन हा घटकही महत्त्वाचा आहे.

union minister murlidhar mohol solve pune air passengers problem face after flight cancel
केंद्रीय मंत्री मोहोळांचा एक फोन अन् पुणेकर हवाई प्रवाशांचा प्रश्न चुटकीसरशी सुटला!

मोहोळ यांनी कंपनीला दुसरे विमान उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिल्याने तातडीने प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागला.