मुरलीधर मोहोळ Photos
कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला आहे. मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.
कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली.
Read More