मविआ

महाविकास आघाडीची (MVA) स्थापना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वात मविआची स्थापना झाली होती.


२०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला. त्यानंतर महायुती तुटली. केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण निहित वेळेत बहुमत सिद्ध करता न आल्याने अवघ्या अडीच दिवसांत हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.


अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. हे सरकार अडीच वर्षे टिकले. यानंतर शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपाबरोबर युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पुढे २०२३ साली महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी देखील पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


Read More
Congress leader Vijay Wadettiwar on Nashik and Raigad Guardian Minister Dispute
Vijay Wadettiwar: आधी वडेट्टीवार बोलले मग राऊतांनीही केलं वक्तव्य; मविआच्या नेत्यांचा कुणाकडे रोख?

Vijay Wadettiwar: “शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’पुढे येईल”, असं सूचक विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यांच्या विधानाची चर्चा…

CM Devendra Fadnavis criticizes Shiv Sena thackeray group Sanjay Rauts statement
Devendra Fadnavis: ‘मविआ राहिल की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही’: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: “राज ठाकरे की उद्धव ठाकरे?”, असा प्रश्न नुकत्याच एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर…

Congress MLA Vijay Vijay Wadettiwar Statement on MVA Seat Allotment Scam
Vijay Wadettiwar: “मविआच्या जागांचा घोळ दोन दिवसांत सुटला असता तर…”; काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

Vijay Wadettiwar: “महाविकास आघाडीत तब्बल २० दिवस जागांचा घोळ कायम ठेवण्यात आला, जागावाटपाच्या घोळाचाच मविआला विधानसभा निवडणुकीत फटका बसला”, असं…

mahavikas aghadi protest in Nagpur against union home minister amit shah over his statement on babasaheb Ambedkar
10 Photos
Photos : अमित शाहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात मविआ आक्रमक; नागपूरात केले आंदोलन, पाहा फोटो

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानभवन परिसरात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

Prakash Ambedkar succeeded in retaining his vote share in the assembly elections Mumbai news
‘वंचित’मुळे मविआला २० जागांवर फटका; मतटक्का राखण्यात प्रकाश आंबेडकर यांना यश

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’मुळे ‘महाविकास आघाडी’च्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

MVA protest against voting machines Sharad Pawar Uddhav Thackeray hold separate meetings Mumbai news print politics news
मतदान यंत्रांविरोधात ‘मविआ’चे आंदोलनास्त्र; शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या स्वतंत्र बैठका

विधानसभेत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेनेच्या (ठाकरेे) पराभूत उमेदवारांच्या बैठका दोन्ही पक्षांकडून घेण्यात आल्या.

Assembly elections 2024 Kolhapur district Mahayuti dominance Congress and NCP defeat
कोल्हापूरचा राजकीय इतिहास-भूगोल बदलला; महायुतीच्या प्रभावाने मविआ निष्प्रभ

विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालाने कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले आहे.

sanjay raut gave a information about Mahavikas aghadis elected MLAs in Mumbai after vidhansabha election 2024 result
मविआच्या निवडून येणाऱ्या आमदारांची मुंबईत व्यवस्था, संजय राऊतांची माहिती | Sanjay Raut

मविआच्या निवडून येणाऱ्या आमदारांची मुंबईत व्यवस्था, संजय राऊतांची माहिती | Sanjay Raut

Vidhan Sabha Election Exit Poll Result
Maharashtra Exit Poll Updates: लोकसभेला एग्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले होते, विधानसभेला काय होणार? महायुती की मविआ?

Maharashtra Assembly Elections 2024 Exit Poll Updates: लोकसभेवेळी फिरलेले एग्झिट पोलचे निकाल विधानसभा निवडणुकीत कायम राहतील की पुन्हा खोटे ठरतील?

Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची खेळी शरद पवार यांनी श्रीवर्धन मतदारसंघात केली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या