मविआ Photos

महाविकास आघाडीची (MVA) स्थापना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वात मविआची स्थापना झाली होती.


२०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला. त्यानंतर महायुती तुटली. केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण निहित वेळेत बहुमत सिद्ध करता न आल्याने अवघ्या अडीच दिवसांत हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.


अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. हे सरकार अडीच वर्षे टिकले. यानंतर शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपाबरोबर युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पुढे २०२३ साली महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी देखील पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


Read More
MVA Manifesto details Loksatta
11 Photos
Maha Vikas Aghadi : महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार तर शेतकऱ्यांना… मविआची विधानसभा निवडणुकीची पंचसूत्री जाहीर!

MVA manifesto Panchsutri 2025 : महाविकास आघाडीने नुकताच जाहीरनामा प्रसिद्द केला आहे. चला याबद्दल जाणून घेऊ.

Mahavikas Aghadi Mahamorcha Mumbai Live
9 Photos
MVA Mahamorcha : मुंबईच्या रस्त्यांवर लोटला जनसागर! उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे, अजित पवारांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते महामोर्चात सहभागी

महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’त शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

11 Photos
Photos : राज्यातील एसटी संप चिघळला, २५० पैकी २२३ आगार बंद, सणासुदीत प्रवाशांचे मोठे हाल

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं दिसत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एसटीच्या २५० आगारांपैकी २२३ आगार बंद झालेत. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे…