मविआ Videos

महाविकास आघाडीची (MVA) स्थापना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वात मविआची स्थापना झाली होती.


२०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला. त्यानंतर महायुती तुटली. केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण निहित वेळेत बहुमत सिद्ध करता न आल्याने अवघ्या अडीच दिवसांत हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.


अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. हे सरकार अडीच वर्षे टिकले. यानंतर शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपाबरोबर युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पुढे २०२३ साली महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी देखील पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


Read More
Shivsena Thackeray Group MP Sanjay Raut on DCM Devendra Fadnavis
Sanjay Raut on Devendra Fadnavis: मविआतील ‘ती’ गोष्ट; फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांचा इशारा

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्याबाबात झालेल्या चर्चेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली…

MNS Candidate Gajanan Kales challenge to MVA and Mahayuti candidates
MNS Gajanan Kale: एकनिष्ठतेचा बाँड; गजानन काळेंचं मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांना आव्हान

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी आपण आमदार झाल्यानंतर पक्ष बदलणार नाही, असं बाँड पेपरवर लिहून दिलं आहे.…

Shivsena UBT chief Uddhav Thackeray hes Bag check Vani
Uddhav Thackeray: वणीत बॅग तपासल्यावर उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान, मविआचे कार्यकर्ते आता..

Uddhav Thackeray Bag check Vani Speech: उद्धव ठाकरे हे सभेसाठी वणी येथे दाखल झाले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी…

Mahavikas Aghadi Sabha Live at BKC
MVA Sabha Live: मुंबईत फुटणार मविआच्या प्रचाराचा नारळ, जाहीर सभा Live

मुंबईत आज महाविकास आघाडीची सभा पार पडत आहे. त्यानिमित्ताने महाविकास आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. आज राहुल गांधी हे देखील…

Sanjay Raut Live: मविआमधील उर्वरित जागांचा तिढा कधी सुटणार? संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
Sanjay Raut Live: मविआमधील उर्वरित जागांचा तिढा कधी सुटणार? संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

खासदार संजय राऊत हे सध्या मुंबईतून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहे. महाविकास आघाडीमध्ये ८५ च्या फाॅर्म्युलानुसार जागावाटप झालेलं आहे. मॅरेथाॅन…

Nana Patoles reaction to Sanjay Rauts statement about seat sharing
संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांना मविआच्या जागावाटपावर भाष्य केले होते. “शिवसेना ‘शतक’ ठोकणार!”, असं त्यावेळी संजय राऊत…

shivsena thackeray group mp sanjay rauts press conference on election seat sharing live
Sanjay Raut Live: मविआमधील उर्वरित जागांचा तिढा कधी सुटणार? संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

खासदार संजय राऊत हे सध्या मुंबईतून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहे. महाविकास आघाडीमध्ये ८५ च्या फाॅर्म्युलानुसार जागावाटप झालेलं आहे. मॅरेथाॅन…

Sanjay Shirsat criticized the MahaVikasAghadi over maharashtra election 2024
Sanjay Shirsat: “त्यांचा फेविकॉल… “; मविआवर संजय शिरसाट यांची टीका

मविआमधील जागावाटपाच्या मुद्द्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. “गेल्या दीड महिन्यांपासून मविआच्या बैठका सुरु…