नागालँड या ईशान्येकडील राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी निवडणुकांचे आयोजन करण्यात आले होते. मतदानानंतर लवकरच मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली गेली. या निवडणुकांचे निकाल २ मार्च २०२३ रोजी जाहीर केले जाणार आहे. १२ मार्च २०२३ रोजी १३ व्या नागालँड विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीपीपी आणि भाजपा या पक्षांच्या उमेदवारांनी बहुतांश जागा जिंकल्या. पुढे त्यांनी युती करत सरकार देखील स्थापन केले. त्यानंतर नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेफिऊ रिओ मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्येही एनडीपीपी आणि भाजपा यांना बहुमत मिळणार असून ते मिळून पुन्हा सत्तास्थापना करणार असल्याचे संकेत आहेत.
नागालँड विधानसभा निवडणुकांमध्ये (Nagaland Assembly Election 2023) भाजपाने २० तर एनडीपीपीने ४० जागा लढवल्या होत्या. इंडिया टुडेच्या चाचणीत एनडीपीपीला २८ ते ३४ तर भाजपला १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामानाने इतर पक्ष सहा ते सात जागा जिंकू शकतील असे म्हटले जात आहे.
२ मार्च २०२३ रोजी मतमोजणी पूर्ण करुन निकाल घोषित झाले. भाजपाला आपल्या जोडीदार पक्षांसह सत्ता राखण्यात यश मिळाले. Read More
देशाच्या राजकारणासाठी ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालाचा नेमका अर्थ काय आहे, यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण…
मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडल्यानंतर या दोन राज्यांसह त्रिपुरातील मतदानोत्तर चाचणीचे (एक्झिट पोल) अंदाज हाती आले आहेत.