नागपूर न्यूज News
लोकसत्ताच्या या सदरामध्ये नागपूर शहरातील सर्व बातम्या (Nagpur News) वाचता येतील. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. तसेच नागपूर हे शहर संत्र्यांसाठी ओळखले जाते. नागपुराच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून तेथे मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. नागपूर शहरात नाग नदी आहे, ज्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले आहे. इ. स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली.
मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे.
नागपूरमध्ये देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरमधील स्थानिक समस्या, घडामोडी, राजकीय घडामोडींबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.
Read More