नागपूर न्यूज Photos

लोकसत्ताच्या या सदरामध्ये नागपूर शहरातील सर्व बातम्या (Nagpur News) वाचता येतील. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. तसेच नागपूर हे शहर संत्र्यांसाठी ओळखले जाते. नागपुराच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून तेथे मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. नागपूर शहरात नाग नदी आहे, ज्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले आहे. इ. स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली.


मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे.


नागपूरमध्ये देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरमधील स्थानिक समस्या, घडामोडी, राजकीय घडामोडींबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.


Read More
Nagpur city, heavy rain ambazari lake overflow, flood, rescue operation
12 Photos
Photos : नागपूरकरांची मुसळधार पावसामुळे दाणादाण, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, वस्त्यांमध्ये पाणी

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे .

Nagpur Potholes Photos 2023
15 Photos
Photos: खड्ड्यांत गेलेली उपराजधानी…; ‘लोकसत्ता’ने नागपूर शहरभर फिरून गोळा केले हे पुरावे

कामगार नगरातील एका रस्त्याचे हे चित्र बघितले की प्रशासनाने भररस्त्यावर सलग तीन जलतरण तलाव बांधले की काय, अशी शंका येते.

Raka Tiger Information Photos
9 Photos
Photos: चर्चेतला वाघ – देखणा, दमदार ‘राका’

अलीकडेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मामला परिसरात वास्तव्य असलेल्या ‘राका’ या वाघाचा दमदार चालीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर बराच प्रसिद्ध झाला.

Katrina BT3 Tigress Information Photos
9 Photos
Photos: चर्चेतला वाघ – बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी ‘कॅटरिना’

तिची एक झलक बघण्यासाठी पर्यटक आसुसलेले असतात. तर तिच्या अदा टिपण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये चढाओढ असते. एवढी ती लोकप्रिय आहे.

Bajrang-Male-Tiger-Tadoba
10 Photos
Photos: चर्चेतला वाघ – ताडोबाची शान ‘बजरंग’ वाघ

ताडोबातील कोणत्याही वाघांपैकी तो कदाचित सर्वात मोठा वाघ आहे. सर्वाधिक वाघिणींना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा कदाचित त्याचा रेकॉर्ड आहे.

28 Photos
Photos: उद्घाटन, तिकीट खरेदी अन् ‘समृद्धी’ला जाण्यासाठी ‘झिरो माईल’पर्यंत मेट्रो प्रवास; मोदींचे Nagpur Metro मधील फोटो

PM Modi in Nagpur Metro: पंतप्रधान मोदींनी उद्घाटनानंतर नागपूर मेट्रोने प्रवास केल्यानंतर या प्रवासादरम्यानचे मेट्रोमधील काही खास फोटो शेअर केलेत

9 Photos
Photos: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्तथरारक हवाई कसरतींनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

उपराजधानीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकाॅप्टरच्या चमूने सहभाग घेतला होता.