नांदेड हा मराठवाडा विभागातील एक जिल्हा असून ते ऐतिहासिक शहर आहे. नांदेड (Nanded) हे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर वसले आहे. नांदेडचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किमी असून या जिल्ह्यात १६ तालुके आहेत. धार्मिकदृष्ट्या नांदेड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून शीख धर्मीयांचे शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचा प्रसिद्ध गुरुद्वारा येथे आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वाचे शहर आहे. गोविंदसिंह यांच्या गुरुद्वारासह माहुरच्या रेणुकादेवीचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर अशी महत्त्वाची मंदिरं नांदेड जिल्ह्यात आहेत. तसेच शंभर फूटी मजार, बिलोली मशिददेखील येथे आहे. याचबरोबर प्रसिद्ध भुईकोट किल्ला आणि सहस्रकुंडचा धबधबा ही नांदेड जिल्ह्यात आहे. Read More
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात तब्बल ३८ वर्षांनंतर पोटनिवडणूक होत असून पहिल्यावेळी अशोक चव्हाण यांचे…
किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार गोविंद सांबन्ना जेठेवार यांनी मंगळवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला…