
नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत. २०१९ मध्ये ते भाजपात गेले. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. तर २००५ पर्यंत म्हणजेच जवळपास चाळीस वर्षे ते शिवसेना या पक्षात होते. बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जायचे. उद्धव ठाकरेंशी मतभेद झाल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ज्यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेस पक्षातही त्यांनी विविध मंत्रिपदं भुषवली. मात्र त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पुन्हा होता आलं नाही. त्यांनी काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते भाजपात गेले. त्यांना केंद्रात लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. २०२४ मध्ये ते भाजपाच्या तिकिटावर पुन्हा निवडून आले. मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. बहुदा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले धडाडीचे राजकारणी असा त्यांचा लौकिक होता.