ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात. यंदा त्यांनी गुजरातमधील कच्छ येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळील सर क्रीक येथील जवानांबरोबर दिवाळी साजरी केली.
लडाख सीमेवरील तणावामुळे मोदी आणि जिनपिंग यांच्यात तब्बल पाच वर्षांनी नियोजनबद्ध चर्चा झाली. यापूर्वी ऑक्टोबर २०१९मध्ये ममलापूरम येथे दोघांमध्ये संवाद झाला होता.
प्रदुषणाच्या मुद्द्यावरूनच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. भगवंत मान यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं.