ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
रोजगारनिर्मिती वा नोकरभरतीच्या मुद्द्यावर बहुधा शेवटची विधानसभा निवडणूक लढवली गेली ती बिहारमध्ये! त्यानंतर महाराष्ट्राच्या ‘लाडक्या बहिणीं’नी दाखवलेली रेवड्यांची लाट आता मुळातच रेवड्यांवर दिल्ली विधानसभा जिंकणाऱ्या ‘आप’च्या विरोधात भाजप व काँग्रेसने आणली आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजनेंतर्गंत मालकी पट्टे मिळालेल्या काही निवडक लाभार्थ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यात नागपूर जिल्ह्यातील रोशन पाटील यांना संधी देण्यात आली.मोदींनी रोशन पाटील यांच्याशी मराठीतून संवाद साधला.
Pattern Of BJP To Attack Rahul Gandhi : गेल्या दोन वर्षांपासून, भाजपने राहुल गांधींना राष्ट्रीय हिताच्या विरोधातील व्यक्ती म्हणून चित्रित करत, त्यांना वारंवार लक्ष्य केले आहे.
Union Budget 2025 : अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. सीतारमण यांनी आतापर्यंत ७ पूर्ण अर्थसंकल्प आणि १ अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.
महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पुन्हा पुन्हा निवडून कसे यायचे’, ‘मतदारसंघांत कामे कशी करायची’ यावर गुरुमंत्र दिला.