गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होत आहे.
नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिका आणि त्र्यंबक नगरपालिकांसह अन्य काही आस्थापनांनी अपेक्षित खर्चाचा आराखडा सादर केला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या बाह्य वळण रस्त्याचा गांभिर्याने विचार सुरू झाला आहे.