नाशिक न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
nashik onion price
निर्यात शुल्क हटविल्यानंतरही कांदा दरात घसरण, क्विंटलचे दर १२५० रुपयांवर

मार्च अखेरीस केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

experts say Ready Reckoner price hike unlikely to have direct impact on house prices
रेडिरेकनर दरवाढीचा घरांच्या किंमतीवर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी – अभ्यासकांचा सूर

राज्य शासनाकडून जळगाव शहरासाठी वार्षिक बाजारमूल्य दरात म्हणजेच रेडिरेकनरमध्ये तब्बल ५.८१ टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे.

new financial year will see a 2 percent property tax hike and new rental taxation
नववर्षात महापालिकेच्या कररचनेत बदल

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता करात दोन टक्के वाढ, नवीन औद्योगिक मिळकतींच्या मूल्यांकन दरात सुधारणा, भाडेतत्वावरील मिळकतींसाठी नवी…

traffic policeman suspended after demanding Rs 50 from driver in Jalgaon
जळगाव जिल्ह्यात मालमोटार चालकाकडे पैसे मागितल्याने निलंबित पोलिसांची संख्या आता तीनवर

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमोटार चालकाकडून वाहतूक पोलीस ५० रुपये मागत असल्याची चित्रफीत समाज माध्यमात फिरल्यानंतर, रविवारी संबंधिताचे…

Sales down by 15 to 20 percent this year due to high price hikes in gold market
जळगाव सराफ बाजारात गुढीपाडवा निरुत्साहात; सोने दरातील उच्चांकी दरवाढीचा परिणाम

कोट्यवधींच्या उलाढालीमुळे उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या सराफ बाजारात दरवर्षीच्या तुलनेत उच्चांकी दरवाढीमुळे यंदा १५ ते २० टक्क्यांनी कमी विक्री झाली.

It is more difficult to become Sarpanch than MLA Minister Gulabrao Patil comments
आमदार होण्यापेक्षा सरपंच होणे अवघड; मंत्री गुलाबराव पाटील यांची टिप्पणी

आमदाराचे कसे असते, या गावात मत मिळाले नाही तर दुसऱ्या गावात मिळतात. पण सरपंचांचे तसे नसते, अशी मिश्किल टिप्पणी शिवसेनेचे…

Sadhus and Mahants demand removal of bus depot at Kumbh Mela meeting nashik news
तपोवनात शाळा, घरांना परवानगी देण्यास विरोध; कुंभमेळा बैठकीत बस डेपो हटविण्याची साधू-महंतांची मागणी

कुंभमेळा तयारीच्या अनुंषंगाने राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साधू-महंतांशी संवाद साधला.

Offline request for construction permission Municipal Commissioners prepare for joint workshop
बांधकाम परवानगीसाठी ऑफलाईनचा आग्रह; मनपा आयुक्तांची संयुक्त कार्यशाळेची तयारी

महापालिकेत गुरुवारी मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी क्रेडाई, नरेडको, वास्तुविशारद आणि अभियंता आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्या अडचणी, प्रश्न…

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी नाशिकमधून रसद -जिल्हाभरातून शेकडो वाहने नेण्याची तयारी

कधीकाळी मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात स्थानिक पातळीवरून मोठी रसद पुरवली जात असे. तेव्हा मनसेचा नाशिक बालेकिल्ला होता.

Seizure registered on agricultural lands of more than 28 thousand defaulters in Nashik District Bank
२८ हजारहून अधिक थकबाकीदारांच्या शेतजमिनींवर जप्तीची नोंद; नाशिक जिल्हा बँकेचे ७५० कर्मचारी कार्यरत, वसुलीचे संथ प्रमाण

विधीमंडळ अधिवेशनात अखेरच्या क्षणी दिलासा मिळेल, ही अपेक्षा आणि शेतकरी संघटनांकडून केली जाणारी दिशाभूल यामुळे थकबाकी वसुलीत जिल्हा मध्यवर्ती बँकेला…

संबंधित बातम्या