नाशिक न्यूज News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
Credit institution depositors Locked up chairman and other officer
पतसंस्था ठेवीदारांनी अध्यक्षासह अधिकाऱ्याला कोंडले…

जनुभाऊ आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आक्रमक होत पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षांसह सहकार अधिकाऱ्याला संस्था कार्यालयात कोंडून ठेवले.

Chetak Festival, Horse Sarangkheda Chetak Festival,
अबब…सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये १९ कोटींचा घोडा

जास्पर अर्थातच मौल्यवान सूर्यकांतमणी. नावाप्रमाणेच असलेल्या एका घोड्याची किंमत तुम्ही ऐकून थक्क व्हाल. एक, दोन नव्हे तर, तब्बल १९ कोटी…

Dada Bhuses son Aviskar Bhuse attacked by suspected cattle smugglers in two cars
मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या वाहनावर संशयित गोवंश तस्करांचा हल्ला

मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या वाहनावर दोन मोटारीतून आलेल्या संशयित गोवंश तस्करांनी हल्ला केला

new route for climbing Salota Fort near Salher
साल्हेरजवळील सालोटा किल्ल्यावर चढाईसाठी नवीन वाट

महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेरचा जुळा भाऊ म्हटल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्यातील सालोटा किल्लावर जाण्यासाठी अपरिचित असलेली दुसरी वाट शोधण्यात आली…

fraud by Police on pretext of doubling money in jalgaon
पैसे तिप्पट करण्याच्या बहाण्याने पोलिसांकडूनच फसवणूक

पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने ग्रामसेवकाला सुमारे १६ लाख रुपयांना फसवविण्यात आल्याचे जळगाव जिल्ह्यात उघडकीस आले आहे.

Chhagan Bhujbal angry at not getting a ministerial position towards rebellion nashik news
‘फडणवीस यांच्या आग्रहानंतरही पक्षाकडून दुर्लक्ष’

मंत्रिपद न मिळाल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची पाऊले आता तिसऱ्या बंडाच्या दिशेने पडत आहेत.

Kumbh Mela Nashik , Nashik Guardian Minister,
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पालकमंत्रिपदाला महत्व, महायुतीत शह-काटशहाचे राजकारण

हिंदू धर्मियांच्या प्रमुख उत्सवापैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी कुंभनगरीत सुरू झाली असून या नियोजनावर आपला प्रभाव राखण्यासाठी…

Uniforms for government officials at Nashik Collector Office
नववर्षात नाशिकमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना गणवेश; महिन्यातून एकदा सार्वजनिक वाहतूक वापराचे बंधन

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नववर्षात आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी शासकीय अधिकारी व कर्मचारी विशिष्ट रंगाच्या पेहरावात दिसतील.

28 passengers injured after bus falls into a pothole in Jalgaon district
जळगाव जिल्ह्यात बस खड्ड्यात गेल्याने २८ प्रवासी जखमी

जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात दोनगावजवळ चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस खड्ड्यात गेल्याने विद्यार्थ्यांसह एकूण २८ प्रवासी जखमी झाले.

Takeharsh village struggles for drinking water
टाकेहर्षची पाण्यासाठी वणवण, हंडा मोर्चाचा इशारा

पावसाळा संपून दोन महिनेही होत नाही तोच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.