नाशिक News

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
Two boys arrested for stealing gold chains eight crimes uncovered
सोनसाखळी चोरणारी दोन मुले ताब्यात, आठ गुन्हे उघडकीस

उपनगर पोलीसांच्या या दणक्यामुळे दोन विधी संघर्षित चोरट्यांकडून तब्बल सात लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले.

Alumni Connect to create awareness among tribals about foreign education
आदिवासींमध्ये विदेशी शिक्षणाविषयी जागृतीसाठी ‘अल्युमनी कनेक्ट’

दरवर्षी आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, शिष्यवृत्ती योजनेच्या लक्ष्यांक प्रमाणात लाभ घेणाऱ्यांची…

Municipal Corporations preparations for new project at Sadhugram site
साधुग्राम जागेवर नवीन प्रकल्पासाठी मनपाची तयारी, संकल्पना सुचविण्याचे आवाहन

सिंहस्थ कुंभमेळ्यात वर्षभरासाठी तपोवनात वसविल्या जाणाऱ्या साधुग्रामच्या जागेचा उर्वरित ११ वर्षे कसा वापर करता येईल, यासाठी नागरिकांच्या संकल्पनेतून प्रकल्प साकारण्याची…

Traders cheat 1200 grape growers of Rs 47 crore nashik news
व्यापाऱ्यांकडून १२०० द्राक्ष उत्पादकांची ४७ कोटींना फसवणूक

द्राक्ष खरेदीत व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात मागील तीन वर्षात सुमारे १२०० शेतकऱ्यांची ४७ कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.

Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा कार्यक्रम होणार आहे.

rahul kardile appoint new commissioner of nashik municipal corporation
राहुल कर्डिले नाशिक मनपाचे नवे आयुक्त; डॉ. अशोक करंजकर यांची उचलबांगडी

मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाली आहे. २२ जुलै २०२३ रोजी त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.

nashik dams
नाशिक जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक जलसाठा, आरक्षणासाठी पालकमंत्र्यांची प्रतीक्षा

पावसाळा संपुष्टात आल्यानंतर धरणांमध्ये डिसेंबरअखेरपर्यंत इतका जलसाठा असण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.