नाशिक Videos

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
drunk girl gets into an argument with the police watch the viral video who is wrong nashik
Nashik: दारु पिऊन तरुणीचा भररस्त्यात राडा; नाशिकमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Nashik: नाशिकमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका तरुणीनं रस्त्यावर राडा घातला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Strict rules now in Mahaprasadalaya in Shirdi A big step for the safety of devotees sai baba temple nashik
Shirdi Mahaprasadalay: शिर्डीत महाप्रसादालयात आता कठोर नियम; भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल

Shirdi Trust Decision on Mahaprasad: “महाराष्ट्राचे सगळे भिकारी इथे गोळा झालेत, भोजनावर इथे किमान २५ रुपये तरी आकारायला हवेत” ही…

Chhagan Bhujbals powerful speech in Nashik
Chhagan Bhujbal: “प्रश्र मंत्रिपदाचा नाही अस्मितेचा आहे”; नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे जोरदार भाषण

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. समता परिषदेचा मेळावा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

Madhukar Pichad passed away in Nashik Vaibhav Pichad gives information
Madhukar Pichad Passed Away: मधुकर पिचड यांचे नाशिकमध्ये निधन; वैभव पिचड यांनी दिली माहिती

अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून…

Prime Minister Narendra Modis grand sabha in Nashik Live background of vidhansabha election 2024
PM Modi Live: नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा Live | Nashik

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रात आहे. धुळ्यात त्यांची सभा पार पडली. त्यानंतर आता नाशिकमध्ये मोदींची सभा…

Prime Minister Narendra Modis public meeting in Nashik Live
PM Modi Live: नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा Live | Nashik

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रात आहे. धुळ्यात त्यांची सभा पार पडली. त्यानंतर आता नाशिकमध्ये मोदींची सभा…

Tourists attacked by bees near Shitakada waterfall in Nashik
Bees Attacked on Tourist: मधमाश्यांच्या हल्ल्यात पर्यटक जखमी, काय आणि कसं घडलं?

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवरील हरिहर गडाजवळील प्रसिध्द शितकडा धबधब्यावर प्रस्तरारोहण करण्यासाठी जमलेल्या पर्यटकांवर रविवारी दुपारी मधमाश्यांनी केलेल्या…

Shivsena UBT MLA Aditya thackerays Maharashtra Swabhiman Sabha in Nashik LIVE
Aditya Thackeray Live: नाशिक येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून आदित्य ठाकरे LIVE

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित आज नाशिक येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभा पार पडत आहे. गेल्या…

Detail information about Nashik godavari river flood and Dutondya Maruti idol connection
Dutondya Maruti Idol: दुतोंड्या मारुतीची मूर्ती पुराशी कधीपासून जोडली गेली? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

नाशिकमध्ये पूर आला की एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे दुतोंड्या मारुतीचं. दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीला पाणी लागलं का? अशी…

Deputy Chief Minister Ajit Pawar in Nashik on Jan Samman Yatra
Ajit Pawar in Nashik: पैठणीचं जॅकेट अन् फेटा; अजित पवारांची स्वतःवरच फटकेबाजी

जन सन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (९ऑगस्ट) नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या पेहरावाने सर्वांचंच लक्ष वेधलं. पैठणीचा…