नवरात्री २०२४ News

नवरात्र, नवरात्री किंवा नवरात्रोत्सव हा (Navratri 2023) भारतासह जगभरामध्ये साजरा केला जातो. हिंदू शास्त्राप्रमाणे दर वर्षी ‘शारदीय नवरात्री’, ‘चैत्र नवरात्री’, ‘माघ गुप्त नवरात्री’ आणि ‘आषाढ गुप्त नवरात्री’ असे चार उत्सव पाहायला मिळतात. असे असले तरी बऱ्याच ठिकाणी प्रामुख्याने शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत असल्याचे पाहायला मिळते. शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूमधील आश्विन या महिन्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) असतो. शरद ऋतूमुळे याला “शारदीय नवरात्रोत्सव” (Shardiya Navratri )असे म्हटले जाते. तर चैत्र या हिंदू कॅलेंडरमधील पहिल्या महिन्यामध्ये जो नवरात्रोत्सव असतो त्याला “चैत्र नवरात्रोत्सव” असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. हा उत्सव मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये असतो.


नवरात्रोत्सव (Navratriutsav) या शब्दाची फोड केल्यास त्याचा अर्थ ‘नऊ रात्रींचा उत्सव’ असा होतो. पौराणिक कथांनुसार, महिषासुर नावाचा एक राक्षस मानवांसह देवांनाही त्रास देत होता. त्याने ब्रह्मदेवाची साधना करुन एक वरदान प्राप्त केले होते. या वरदानाच्या बळावर महिषासुरने सर्वत्र हाहाकार माजवला होता. तेव्हा महिषासुरला रोखण्यासाठी देवांनी एकत्र येत आदिशक्तीचे आवाहन केले. आदिशक्तीने दुर्गा हे रुप घेतले. पुढे दुर्गादेवीने महिषासुरच्या विरोधात युद्ध पुकारले. नवरात्रोत्सवच्या नऊ दिवसांमध्ये हे युद्ध सुरु होते असे म्हटले जाते. युद्धाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला दुर्गा देवीने महिषासुरचा वध केला. अंधकारावरचा हा तेजस्वी विजय साजरा करण्यासाठी आपल्याकडे दसरा साजरा केला जातो. या सणाद्वारे विश्वातील स्त्री तत्वाचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते.


नवरात्रोत्सव हा भारतात प्रांतवार पद्धतीने बदलत जातो. महाराष्ट्र, गुजरात व अन्य काही भागांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आश्विन प्रतिपदेच्या दिवशी घट बसवले जातात. यामुळेच या दिवसाला घटस्थापना असे नाव पडले. पश्चिम बंगाल तसेच त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये दुर्गा देवीच्या मोठमोठ्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशामध्ये आपापल्या पद्धतीने हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. गुजरात आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी नवरात्रोत्सवाची मोठी धुम असते. मुंबई-महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव असतो, अगदी त्याच प्रमाणात प.बंगाल त्यातही कोलकातामध्ये नवरात्रीचा जल्लोष असतो. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गुजरातमध्ये दांडिया-गरबा (Garba- Dandiya) खेळत आनंद लुटत असतात.


Read More
Kojagiri Purnima 2024 Wishes In Marathi
Kojagiri Purnima 2024 Wishes : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास मराठीत शुभेच्छा! WhatsApp स्टेटसवर ठेवून प्रियजनांसह साजरा करा आनंद

Kojagiri Purnima 2024 Wishes : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रत्यक्ष भेट होत नसली म्हणून काय झालं तुम्ही WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून…

navratri 2024
पुण्याच्या मंडईत दिसली दुर्गामाता? देवीच्या रुपातील तरुणीला पाहून पुणेकर काय म्हणाले, पाहा Viral Video

एक तरुणी पुण्यातील मंडई परिसरामध्ये दुर्गामातेच्या रुपात दिसली. देवीच्या रुपातील तरुणीला पाहून पुणेकरांची काय होती प्रतिक्रिया?

Durga Puja pandal Hemoshree Bhadra sannati mitra
बाई काय हा प्रकार! दुर्गा पूजेला तोकडे कपडे घालून दर्शन; टीका होताच मॉडेलने पोस्ट केला ‘तसा’ फोटो

Kolkata model at Durga Puja Pandal: कोलकातामधील मॉडेल हेमोश्री भद्रानं दुर्गा पूजेनिमित्त एका मंडळाला भेट दिली. मात्र यावेळी तिने परिधान…

navratri tradition india
लोकसंस्कृतीचा जागर!

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील नवरात्रोत्सवाचा व परंपरेचा हा लेखाजोखा खास व्हिवाच्या वाचकांसाठी!

What is the bow dance Learn about the Bengali dance performed on Durga Puja
धुनुची नृत्य काय आहे? दुर्गापुजेला सादर केले जाणाऱ्या बंगाली नृत्याबाबत जाणून घ्या

दुर्गा पुजा म्हणून ओळखला जाणारा हाउत्सव अनेक रंग, कला आणि नृत्याने साजरा केला जातो. अशा नृत्यामध्ये, धुनुची नृत्य (धुनुची नृत्य)…

Bhavani Talwar Alankar Mahapuja in Navratri Festival of aai Tuljabhavani Devi tuljapur
आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात गुरूवारी आठव्या माळेला तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.

Happy Durga Ashtami 2024 Wishes Messages Status in Marathi
Durga Ashtami 2024 Wishes: दुर्गाष्टमीनिमित्त प्रियजनांना whatsapp Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; ही घ्या शुभेच्छांची लिस्ट

Happy Durga Ashtami 2024 : दुर्गाष्टमीनिमित्त मित्रमंडळी आण नातेवाईकांना खास मराठीतून पाठवा शुभेच्छा

Pivali Jogeshwari Temple History
पुण्यातील या जोगेश्वरीला ‘पिवळी जोगेश्वरी’ का म्हणतात? जाणून घ्या काय आहे इतिहास?

Pivali Jogeshwari Temple : लग्न न होणाऱ्या तरुण-तरुणींच्या प्रार्थनेला पावणारी ‘पिवळी जोगेश्वरी’, या मंदिराचा इतिहास जाणून घ्या

Boy dies of electric shock during Navratri Garba in Kalyan
कल्याणमध्ये गरबा पाहण्यासाठी आलेल्या मुलाचा वीज वाहिनीचा धक्का बसून मृत्यू

कल्याण येथील पश्चिमेतील खडकपाडा भागात मंगळवारी रात्री आपल्या मित्रांसमवेत गरबा पाहण्यासाठी आलेल्या १५ वर्षाच्या एका मुलाचा जिवंत वीज वाहिनीचा धक्का…

Shiv Sena BJP Navratri festival garba program canceled in Dombivli
डोंबिवलीतील शिवसेना-भाजपच्या नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रम गुरुवारी रद्द

प्रसिध्द उद्योगपती, भारतरत्न रतन टाटा यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यात एक दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

ताज्या बातम्या