नवाजुद्दिन सिद्दिकी Photos
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला बराच संघर्ष करावा लागला. अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात नाव कमावणं त्याच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. नवाजने १९९९ सालच्या सरफरोश चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर शूल, मुन्नाभाई एम.बी.बी.एस., आजा नचले, न्यू यॉर्क इत्यादी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. अनेक चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका साकारणाऱ्या नवाजला २०१२ मध्या विद्या बालनसोबत कहानी या चित्रपटात काम केले. त्यानंतर गॅंग्ज ऑफ वासेपूर, तलाश इत्यादी चित्रपटांत त्याच्या प्रमुख भूमिका होत्या. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधल्या नवाजच्या व्यक्तिरेखेची व अभिनयाची विशेष चर्चा झाली.Read More