राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
Rohit Pawar
Rohit Pawar : “त्यांनी जी काही मागणी केली ती…”; आशाताई पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

रोहित पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबबात प्रतिक्रिया दिली आहे.

Former Kinwat Mahur MLA and NCP leader Pradeep Naik died
माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन, दहेली तांडा येथे गुरुवारी अंत्यसंस्कार

किंवट-माहूरचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप नाईक यांचे बुधवारी सकाळी हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन.

Sharad Pawar Ajit Pawar
BJP : शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची ना…”

चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत मोठं विधान केले आहे.

Jitendra Awad demanded resign of Dhananjay Munde s position
अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा तत्काळ घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) विधिमंडळ गटनेते जितेंद्र…

NCP president Sharad Pawar called review meeting
शरद पवारांनी बोलावली आढावा बैठक

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८ आणि ९ जानेवारी रोजी आढावा बैठक बोलाविली…

Sandeep Kshirsagar on Walmik Karad Surrender
Walmik Karad Surrender : “मग पहिल्या दिवसापासून फरार का होते?”; आरोप फेटाळणाऱ्या वाल्मिक कराडांना संदीप क्षीरसागर यांचा थेट सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

chetan tupe meet sharad pawar and made a big statement
Chetan Tupe Meet Sharad Pawar:”सगळ्या महाराष्ट्राची इच्छा…”; चेतन तुपे नेमकं काय म्हणाले?

मागील दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका झाल्या.या दीड वर्षाच्या कालावधीत शरद पवार आणि अजित…

Babanrao Shinde
“विधान परिषदेचा शब्द मिळाल्याशिवाय…”, कार्यकर्त्याचं बबनराव शिंदेंना आवाहन; माजी आमदार म्हणाले…

Babanrao Shinde : माजी आमदार बबनराव शिंदे यांनी माढ्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता

Jitendra Awhad gave a response to Rupali Thombres allegations
Jitendra Awhad: रुपाली ठोंबरेंचा आरोपांना जितेंद्र आव्हांडांचं उत्तर, म्हणाले…

रुपाली ठोंबरे यांनी एक्सवर (ट्विटर) एक कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि जितेंद्र आव्हाड हे देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला…

uttam jankar criticized dcm ajit pawar over vidhansabha election 2024
Uttam Jankar on Ajit Pawar: “मी माझा राजीनामा द्यायला तयार”; उत्तम जानकरांचा

निवडणुकीत जवळपास १५० मतदारसंघात गडबड झालेली आहे. याची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही २० हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून येतं,…

Jitendra Awhad Reacts on Rupali thombare Alleged WhatsApp Chat Shivraj Bangar
“तो कसा मंत्री राहतो तेच बघतो”, रुपाली ठोंबरेंनी शेअर केलं आव्हाडांचं कथित चॅट; आमदार खुलासा करत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Jitendra Awhad on Rupali thombare : संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला…

संबंधित बातम्या