राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
bhaskarrao patil Khatgaonkar defects to ncp securing his and his daughter in laws political future
खतगावकरांचं ठरलं; सूनबाईंसह ‘राष्ट्रवादी’त जाणार!

काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे आणखी एक पक्षांतर अखेर ठरलं आहे. ह्यांच्यासाठी महायुतीतील दोन पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्यानंतर खतगावकर…

abhijeet pawar alleged pressure to join ajit pawars group
जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला नसता तर आत्महत्या केली असती, स्वगृही परतलेले अभिजीत पवार यांची प्रतिक्रिया

अजित पवार गटात जाण्यासाठी माझ्यावर अतिशय दबाव टाकण्यात आला होता आणि केवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्यासाठीच माझा वापर केला…

Image Of Manikrao Kokate
Manikrao Kokate: मंत्रीपद, आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटेंसमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांची मोठी माहिती

Manikrao Kokate Jail: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधातील हे १९९५ सालचे प्रकरण आहे. माजी मंत्री…

Sanjay Kaka Patil news in marathi
सांगलीत माजी खासदार संजयकाका पाटील स्वगृही परतणार ? 

नजीकच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका होणार असून यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे.

Karuna Munde aggressive against Dhananjay Munde
Karuna Munde: धनंजय मुंडेंविरुद्ध ‘करुणा’ आक्रमक; सुप्रिया सुळेंसमोर वाचला तक्रारींचा पाढा

Karuna Munde on Alimony Case: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे…

Anjali Damania allegations on Dhananjay Munde
Anjali Damania : “…तोपर्यंत हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही”, अंजली दमानिया यांचे पुन्हा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत.

malegaon sahakari sakhar karkhana election
बारामतीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’त पुन्हा लढत? माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची तयारी सुरू

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना मतदारांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही निवडणूक चुरशीची होईल, अशी चर्चा बारामतीमध्ये आहे.

Ajit Pawar questions workers at a rally about relying on prayer to win elections.
Ajit Pawar: “नुसतं देव-देव केलं तर निवडून येणार आहे का?”, अजित पवारांचा भर सभेत कार्यकर्त्यांना सवाल

Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि भाषणाच्या खुमासदार शैलीसाठी ओळखले जातात. पत्रकार परिदष असो की जाहीर सभा…

ajit pawar
राष्ट्रवादीच्या प्रमुख समितीत भुजबळ, मुंडे; पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांच्या निर्णयाने आश्चर्य

वादग्रस्त प्रतिमा झालेल्या मुंडे यांना पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात प्रवेश देऊन अजित पवारांनी त्यांचे पक्षातील स्थान अधिक भक्कम केले आहे.

former rss officials bhaiyaji jaushi and chhagan bhujbal meet each other at ram temple ceremony
आरएसएसचे भय्याजी जोशी आणि छगन भुजबळ यांची एकमेकांवर स्तुतिसुमने

नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथे राम मंदिराच्या जीर्णोध्दार सोहळ्यानिमित्त एकत्र आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जौशी आणि छगन…

राष्ट्रवादीच्या नेत्याला लागली होती मृत्यूची चाहूल? वर्षभरापूर्वीच पुस्तकामध्ये लिहून ठेवले..

विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम बिडकर…

Avinash Deshmukh
एकाच इमारतीत चालतात तीन शाळा? शिक्षणाधिकाऱ्यांचे नातलगच त्या शाळेत शिक्षक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपानंतर खळबळ

ज्या शाळेत एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाला, त्या शाळेला शिक्षण विभागाने टाळे लावले आहे. मात्र या शाळेच्या अनेक वादग्रस्त…

संबंधित बातम्या