scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष News

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
One act play Pati won rs 51 000 team prize at NCP state level Ajit Parv contest
अजितपर्व एकांकिका, स्पर्धेत ‘पाटी’ प्रथम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘अजितपर्व’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘पाटी’ या एकांकिकेने ५१ हजार…

NCP has started moves to appoint a new city president, and discussions have begun among senior leaders
नवीन शहराध्यक्षासाठी ‘राष्ट्रवादी’च्या हालचाली, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांंमधून चाचपणी सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या…

ajit pawar marathi news
नांदेडच्या लोकप्रतिनिधींना डावलून ठरलेली बैठक अचानक रद्द ! उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून निघाले होते आदेश : बहुसंख्य आमदार अनभिज्ञच

पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्ह्यातील तीन खासदार आणि महायुतीच्या सर्व १० आमदारांना डावलून नांदेड जिल्ह्याशी संबंधित विकासकामांच्या मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजित…

Solapur NCP news in marathi
सोलापूरमध्ये वादग्रस्त प्रतिमा असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापुरातील पाच माजी नगरसेवकांनी अपेक्षेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ajit pawar
राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विलिनीकरणाची चर्चा वा प्रस्ताव नाही, अजित पवारांचे स्पष्टीकरण फ्रीमियम स्टोरी

पक्षात फूट पडू नये या उद्देशानेच शरद पवारांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केल्याचेही अजित पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Ajit Pawar ncp latest news in marathi
पुण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का प्रीमियम स्टोरी

या पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार चेतन तुपे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा देण्यात यावी, असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सुचविले आहे.

Anil Deshmukh latest comments on reunion of ncp factions
दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेला राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याने दिला पूर्णविराम

अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांची…

Deepak Mankar , NCP , Pune city president,
अखेर दीपक मानकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा

दीपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे. आता यावर…

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची हातमिळवणी? पवारांची की कार्यकर्त्यांची इच्छा? नेमकं काय?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केल्यानंतर दोनच दिवसांनी शरद पवार यांनी हातमिळवणीबाबत भाष्य केले.

NCP MP Praful Patel expressed his views on the unification of Sharad Pawar and Ajit Pawar factions
दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्र येणार? युद्ध विरामवर स्पष्टच बोलले खासदार प्रफुल्ल पटेल

आम्ही पक्षातील सगळे लोक जी प्रमुख मंडळी चर्चा करून भाष्य करणेच योग्य राहील, असे मत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार…

Activists gather before NCP leaders in Satara news
साताऱ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांआधी कार्यकर्ते एकत्र

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा शरद पवार यांनी सुरू केली आणि रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले. यामुळे साताऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा…

ताज्या बातम्या