राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Videos

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
Chhagan Bhujbals appeals to supporters over a protest was held on behalf of the Samata Parishad in Pune
Chhagan Bhujbal on Ajit Pawar: “यापुढे जे कोणी…”; छगन भुजबळ यांचं आवाहन

छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. पुण्यात समता परिषदेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे…

Dhananjay Munde and Pankaja Munde get another chance to become ministers in mahayuti government
Maharashtra Ministers Oath Taking Ceremony: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना पुन्हा मंत्रि‍पदाची संधी

Maharashtra Ministers Oath Taking Ceremony: नागपूरच्या विधीमंडळात महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधीमध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते…

Sunanda Pawars big statement about the two factions of NCP coming together
Sunanda Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सुनंदा पवार यांचं मोठं विधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. १२ डिसेंबर) शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय…

Ajit Pawar takes oath as Deputy Chief Minister at azad maidan mumbai
Ajit Pawar Oath: अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ; पाहा आझाद मैदानातील सोहळा

Ajit Pawar Oath Ceremony: अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जकारणातील वादळांमध्ये अजित पवार अनेक वेळा अडचणीत आले आहेत,…

Chhagan Bhujbal made a demand From the ministerial post
Chhagan Bhujbal on Strike Rate: मंत्रिपदावरून रस्सीखेच? छगन भुजबळांनी केली मागणी

विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेटमध्ये भाजपाच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) दुसरा क्रमांक आहे. तर शिंदे गटाचा तिसरा क्रमांक आहे.…

Yugendra Pawar gave a reaction on results of the 2024 Assembly elections
Yugendra Pawar on Ajit Pawar: अजित पवारांचं अभिनंदन केलं का? युगेंद्र पवार म्हणतात…

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. मात्र निकालावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच काही मतदारसंघात मतांच्या आकडेवारीत…

ncp mlc membed amol mitkari angry on Naresh arora and ajit pawar viral photo
Amol Mitkari and NCP: महायुतीनंतर राष्ट्रवादीत धुसफूस? मिटकरी पक्षावरच का चिडले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि त्यांचे माध्यम सल्लागार नरेश अरोरा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये…

Mahayuti Leader Reactions on Who will be new CM of Maharashtra
Maharashtra CM: महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाची भूमिका काय?

Maharashtra CM: महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होण्याची चिन्हं आहेत. मात्र महायुतीत मुख्यमंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार यावर सध्या चर्चा सुरू आहे.…

Brief analysis of the successes and failures of the Nationalist Congress Party
NCP Sharad Pawar vs Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यश- अपयशाचं संक्षिप्त विश्लेषण

NCP Sharad Pawar vs Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या पाठीशी एक सहानुभूतीची लाट होती आणि त्याच लाटेत…

ताज्या बातम्या