राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार Photos
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये या पक्षाला घरघर लागली. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) या नावाने ओळखले जातात.
शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. या बंडखोरीचा शरद पवार गटाला मोठा फटका बसेल असे समजले जात होते. मात्र वयाच्या ८३ व्या वर्षीही शरद पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केले. समर्थकांना एकत्रित करून तरुणांना संधी देत गटाला उभारणी दिली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस, शिवसेनेसह महाराष्ट्रात भाजपाच्या महायुतीला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या माविकास आघडीने ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. यात शरद पवार यांच्या गटाला ९ जागा मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, शरद पवार गटाला १० पैकी ९ जागा जिंकण्यात यश आले. तर अजित पवार (Ajit pawar) गटाला चार जागा मिळाल्या होत्या, त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली. शरद पवार गटात सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख आणि इतर नेते कार्यरत आहेत. तुतारी हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे.
Read More