निलेश लंके Videos

निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत. निलेश लंके यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेचे शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचे खासदार असा राहिला. सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निलेश लंके याचं घर आजही पत्र्याचं आहेत. निलेश लंके यांचा जन्म १० मार्च १९८० रोजी पारनेरच्या हंगा या गावात झाला. २००४ रोजी ते हंगा शिवसेना शाखा प्रमुख झाले. त्यानंतर २००८ साली पारनेरचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख झाले. २०१० साली हंगा ग्रामपंचायतचे सरपंच झाले. २०१३ साली पारनेरच्या शिवसेना तालुका प्रमुखपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१९ मध्ये राष्ट्रवादीतून पारनेर विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ दिली. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनतर नगर दक्षिणमधून निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि खासदार झाले.


Read More
Nilesh Lankes first speech in Lok Sabha adhiveshan 2024
Nilesh Lanke in Loksabha: निलेश लंकेंच पहिलंच भाषण, सुप्रिया सुळेंनी घेतली बाजू; लोकसभेत काय घडलं?

खासदार निलेश लंके हे आज लोकसभेत बोलत होते. मतदारसंघातील शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी मांडला. यावेळी वेळ संपल्यानंतर अध्यक्षांनी निलेश लंकेंना थांबायला…

ताज्या बातम्या