
निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मोठ्या नेत्या असून मोदी सराकरमध्ये त्या अर्थमंत्री (Finance Minister) आहेत. सप्टेंबर २०१७ ते मे २०१९ या काळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद सांभाळलेले आहे.
सीतारमण यांनी २००६ साली भाजपा पक्षात प्रवेश केला होता. २०१० साली त्यांनी भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.
निर्मला सीतारमण उच्चशिक्षित असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थिनी आहेत.