नितीन गडकरी

नितीन गडकरी

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 21 May 1957
वय 67 Years
जन्म ठिकाण नागपूर
नितीन गडकरी यांचे चरित्र

नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भाजपचे देशातील मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या २०२४ च्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नितीन गडकरींना Highway Man of India म्हणून ओळखले जाते. विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय झाले. १९८९ साली ते भाजपकडून विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.
१९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केले. २००४ ते २००९ दरम्यान गडकरींनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवले. त्यानंतर त्यांनी २००९ ते २०१३ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गडकरींनी एम.कॉम, एलएलबी आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

Read More
नितीन गडकरी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
जयराम गडकरी
आई
भानुमती गडकरी
जोडीदार
कांचन गडकरी
मुले
निखिल गडकरी, सारंग गडकरी, केतकी गडकरी
नेट वर्थ
₹18,79,16,075

नितीन गडकरी न्यूज

 नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचल्याने खळबळ उडाली.
नितीन गडकरींच्या खात्याने बांधलेला पूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचला, कुठे घडली घटना?

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचल्याने खळबळ उडाली.

नितिन गडकरी
(संग्रहित छायाचित्र)
Marathi Sahitya Sammelan 2025: साहित्य संमेलनापासून गडकरी लांब का?…दिल्लीतला प्रमुख मराठी चेहरा असूनही केवळ…

98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 : दुपारी ३.३० वाजता विज्ञान भवनात संमेलनाचे पहिले उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे मोदी हे नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान असतील.

पारडी उड्डाणपुल
गडकरींच्या मतदारसंघातील उड्डाणपूल तब्बल साडेनऊ वर्षानंतर सुरू

पारडी उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. भूमिपूजनाला सुमारे साडेनऊ वर्षे झाले. बांधकाम सुरू होऊन साडेसात वर्षे पूर्ण झाले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कोल्हापूर भेटीवेळी सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
नितीन गडकरी यांच्या स्वागताला कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते; समरजित घाटगे चर्चेत

घाटगे हे पुन्हा भाजपात प्रवेश करण्याची चर्चा सुरू असताना राजकीय दृष्ट्या ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमदार जयंत पाटील. (Photo- ANI)
Nitin Gadkari: “आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा बातम्या…”, जयंत पाटलांचा टोला अन् सभागृह खळखळून हसलं

Rajarambapu Institute of Technology: राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेला आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत “ट्विनिंग प्रोग्राम” सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

जात पात धर्माच्या पलीकडे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे काम केले पाहिजे ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (लोकसत्ता टीम)
जात पात धर्माच्या पलीकडे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे काम केले पाहिजे ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम रस्ते उपलब्ध करून देणे, शुद्ध पाणी मिळवून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे.

गडकरींच्या मतदारसंघाला मिळणार पीएम ई-बसचा पहिला मान  ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
गडकरींच्या मतदारसंघाला मिळणार पीएम ई-बसचा पहिला मान

केंद्र सरकारच्या पी.एम. ई-बस योजनेंतर्गंत देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. ही बस मिळण्याचा पहिला मान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मतदारसंघ नागपूरला मिळणार आहे .

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन FASTag बॅलन्स व्हॅलिडेशन नियम जाहीर केले आहेत, जे १७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील. (Image/PTI)
New Fastag Rules: …तर फास्टॅग असूनही भरावा लागेल दंड, उद्यापासून लागू होणारे ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का?

New Fastag Rules: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन FASTag बॅलन्स व्हॅलिडेशन नियम जाहीर केले आहेत, जे १७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील.

मुख्यमंत्री फडणवीस पाठोपाठ गडकरी सहकुटुंब कुंभमेळ्यात (लोकसत्ता टीम)
मुख्यमंत्री फडणवीस पाठोपाठ गडकरी सहकुटुंब कुंभमेळ्यात

नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी  सहकुटुंब कुंभ स्नानासाठी  रविवारी प्रयागराजला गेले. तेथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे विमानतळावर  स्वागत केले.

संबंधित बातम्या