नितीन गडकरी

नितीन गडकरी

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 21 May 1957
वय 67 Years
जन्म ठिकाण नागपूर
नितीन गडकरी यांचे चरित्र

नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भाजपचे देशातील मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या २०२४ च्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नितीन गडकरींना Highway Man of India म्हणून ओळखले जाते. विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय झाले. १९८९ साली ते भाजपकडून विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.
१९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केले. २००४ ते २००९ दरम्यान गडकरींनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवले. त्यानंतर त्यांनी २००९ ते २०१३ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गडकरींनी एम.कॉम, एलएलबी आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

Read More
नितीन गडकरी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
जयराम गडकरी
आई
भानुमती गडकरी
जोडीदार
कांचन गडकरी
मुले
निखिल गडकरी, सारंग गडकरी, केतकी गडकरी
नेट वर्थ
₹18,79,16,075

नितीन गडकरी न्यूज

बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय बडोलेंचा नव्हता तर देवेंद्र फडणवीस व माझा होता नितीन गडकरी म्हणाले
बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय माझा व फडणवीसांचा, गडकरी

बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय बडोलेंचा नव्हता तर देवेंद्र फडणवीस व माझा होता, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यानो आपल्या मनातील गैरसमज दूर करावा,असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संविधान आम्ही बदलणार नाही, कुणाला बदलू देणार नाही आणि कुणाची बदलण्याची हिंमत नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी ठाण्यातील जाहीर सभेत बोलताना सांगितले.

निवडणुकीतच जातीचा विचार का; नितीन गडकरी यांचा प्रश्न ( PC:TIEPL)
निवडणुकीतच जातीचा विचार का; नितीन गडकरी यांचा प्रश्न

चवदार खाद्यपदार्थ घेताना जातीचा विचार कोणी करीत नाही. हृदय शस्त्रक्रिया करताना उत्तम डॉक्टर हवा असल्याने तेव्हा जातीचा विचार नसतो.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र गडकरी यांनी पालथा घातला.
गडकरींकडून महाराष्ट्र पालथा

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने १३ दिवसांमंध्ये महाराष्ट्रभरात फिरून महायुतीसाठी प्रचार सभा घतल्या

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एलिव्हेटेड रस्त्यांचे जाळे निर्माण करणार - नितीन गडकरी (छायाचित्र - लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एलिव्हेटेड रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी

या निवडणुकीत तुम्ही जगताप यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, त्यांच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न, वाहतुकीच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी मी देतो, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंचवडकरांना आवाहन केले.

विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन (image credit - Nitin Gadkari/fb)
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन

भारतीय जनता पक्ष महायुतीचे कोथरूडमधील उमेदवार, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ कर्वे पुतळ्याजवळ झालेल्या सभेत गडकरी बोलत होते.

Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही - नितीन गडकरी (photo credit - Nitin Gadkari/X)
Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही – नितीन गडकरी

ज्यांनी राज्यघटना ताेडण्याचे पाप केले, तेच लाेक आता हातात घटना घेऊन जहरी आणि खाेटा प्रचार करत असल्याची टीका केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

 अद्याप या नेत्यांच्या एकत्रित सभा नागपुरात किंवा विदर्भात विधानसभेसाठी झाली नाही.(संग्रहित छायाचित्र)
Nagpur Assembly Constituency : गडकरी-फडणवीस यांच्या संयुक्तप्रचार सभेच्या मुहुर्ताची प्रतीक्षा

Devendra Fadnavis and Nitin Gadkari Campaign Meeting : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना विदभार्तील दोन प्रमुख नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांची आतापर्यंत एकत्र सभा न होण्याचा मुद्दा चर्चेत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
जात लोकांच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात! नितीन गडकरी यांचे मत

आमच्याकडे जातीवादाची भुते होती. जो करेगा जात की बात उस को मारूंगा लाथ, असे आपण पंचवीस हजार लोकांसमोर बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या