नितीन गडकरी Photos
नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भाजपचे देशातील मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या २०२४ च्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नितीन गडकरींना Highway Man of India म्हणून ओळखले जाते. विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय झाले. १९८९ साली ते भाजपकडून विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.
१९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केले. २००४ ते २००९ दरम्यान गडकरींनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवले. त्यानंतर त्यांनी २००९ ते २०१३ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गडकरींनी एम.कॉम, एलएलबी आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.
Read More