नोरा फतेही News
तेलुगू चित्रपटांमध्ये आयटम साँग करत नोरा फतेहीने कलाक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. नोरा तिच्या नृत्य कौशल्यामुळे नावारुपाला आली. २०१६मध्ये छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये तिने सहभाग घेतला. सत्यमेव जयते चित्रपटामधील दिलबर या गाण्यामुळे नोरा प्रकाशझोतात आली. शिवाय काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही नोराने काम केलं आहे. भारत, स्ट्रीट डान्सर थ्रीडी, सत्यमेव जयते २ चित्रपटांमध्ये नोराने अभिनेत्री म्हणून काम केलं. तिच्या सिंगल गाण्यांच्या व्हिडीओला युट्यूबवर कोटींच्या घरात व्ह्यूज मिळतात. Read More