ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024) खेळांचे आयोजन यंदा पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक २०२४ खेळवले जाणार आहेत. २६ जुलैला ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर (Paris Olympic Games 2024 होणार आहे. यंदाच्या ऑलिम्पकमध्ये २०६ देश सहभागी झाले असून १० हजारांच्या आसपास जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत.
भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ११७ खेळाडू सहभागी झाले असून १६ विविध खेळांमध्ये हे खेळाडू पदकं जिंकण्याच्या आशेने उतरणार आहेत. हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांवर विशेष लक्ष असेल. भारताच्या ऑलिम्पिक २०२४ मोहिमेची सुरूवात तिरंदाजी स्पर्धेने होणार आहे.